(फोटो सौजन्य – X)
तुम्ही जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर इथे अनेक थरारक व्हिडिओज व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील. काही तरी नवीन करण्याचा नादात लोक आपल्या जीवाशी खेळू पाहतात आणि काही तरी विचित्र करतात. बऱ्याचदा त्यांचा हा प्रकल्प यशस्वी होतोच असे नाही, काहीदा हे प्रकार जीवावर देखील बेततात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. यातील दृश्ये फारच भयंकर असून ती तुमच्या अंगावर काटा आणू शकतात. चला यात काय घडले ते जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
अलिकडेच सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका मुलीचा अतिशहाणपणा तिला चांगलाच महागात पडल्याचे दिसून आले. वास्तविक मुलगी ट्रेन स्टेशनवर पोहचण्याच्या आधीच चालू ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करते मात्र यात ती फेल होते आणि तिच्यासोबत गंभीर अपघात घडून येतो. चालू ट्रेनमधून उतरताना मुलीचा तोल ढासळतो आणि ती जोरदार खाली आपटली जाते. ही घटना केवळ धोकादायक वर्तनाकडे लक्ष वेधत नाही तर रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्याबद्दल गंभीर प्रश्न देखील उपस्थित करते.
व्हिडिओमध्ये एक मुलगी चालत्या ट्रेनच्या दाराशी उभी राहून उतरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आजच्या युगात सोशल मीडियाचा प्रभाव इतका खोलवर गेला आहे की लोक रील आणि व्हायरल व्हिडिओ बनवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. रेल्वेशी संबंधित धोकादायक स्टंट व्हायरल होण्याची ही पहिलीच घटना नाही तर याआधीही असे प्रकार समोर आले आहेत ज्यात लोकांनी आपला जीव देखील गमावला आहे.
??? pic.twitter.com/LFeFQjDboT
— आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) May 4, 2025
फाटके कपडे अन् फाटकी झोळी! भिकाऱ्याचा थेट वंदे भारतमधून प्रवास; टीसीने तिकीट विचारताच…, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @AnathNagrik नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून युजर्सने यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “या मुलीसोबत हे घडणारच होते, मुलगी वाचली तर ती आयुष्यात पुन्हा कधीही ट्रेनमध्ये चढणार नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यात चुकी मुलीची होती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.