महिला रील बनवत होती तेवढ्यात ओढणीला लागली आग; लोक म्हणाले, "लाइकसाठी आता काय स्वतःचा जीव घेशील"; Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्सचे व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी अपघातांचे तर कधी विचित्र जुगाड इथे शेअर केले जातात. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक इंटरनेटवर नको नको ते प्रकार करू पाहतात. यात बऱ्याचदा लोकांची फसगत होते. अनेकदा लोक आपला जीव धोक्यात घालून स्टंट्स करू पाहतात आणि मग त्यांच्यावर पस्तावण्याची वेळ येते. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. यात महिलेला रील बनवणं इतकं महागात पडलं की यात तीचा जीवच धोक्यात पडला. नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
व्हिडिओत काय घडलं?
सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना व्हायरल होत आहे, यातील दृश्ये तुमचा थरकाप उडवू शकतात. व्हायरल व्हिडिओत जर तुम्ही पाहिलं तर यात दिसत की, एक महिला आपल्या घरातील किचनमध्ये रील बनवू पाहत असते. मात्र यावेळी ती किचनच्या कट्ट्यावर बसून हा रील बनवण्याचा प्रयत्न करते. तिचा हा जीवघेणा स्टंट पुढे तिला चांगलाच महागात पडतो आणि तिला जन्माची अद्दल घडते. वास्तविक व्हिडिओत पुढे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला यात दिसेल की, महिला रील बनवण्यासाठी जसा आपला फोन चालू करायला जाते त्याचयावेळी अचानक तिच्या ओढणीला आग लागते. ती हा सर्व प्रकार गॅसच्या समोर करू पाहत असते ज्यामुळे गॅसवरील आग लगेच तिच्या ओढणीला पेट घेते. यांनतर महिला ओढणीवरील आग विझविण्याचा प्रयत्न करते. पुढे नक्की काय घडलं याबाबत व्हिडिओत आणखीन कोणतीच माहिती देण्यात आली नाही. मात्र सोशल मीडियावर महिलेचा हा पराक्रम आता चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @_sapana_singh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेबाबतचे आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “एका लाइकसाठी तुम्ही स्वतःला पेटवून घेणार आहात का? कसे कसे लोक आहेत या जगात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आला स्वाद” आणखीन एका युजरने लिहिले आहे, ” तू मूर्ख आहेस”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा ना