Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साहसी खेळ जीवावर बेतला! गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करताना दोर गळ्यात अडकला अन् तरुणीने समोर पाहिला यमराज

Paragliding Accident Video : आनंदाचे क्षण दुःखात बदलले आणि महिलेने अनुभवला आयुष्यातील सर्वात वाईट क्षण. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करताना तिच्यासोबत असं काही घडलं की पाहून सर्वांचाच थरकाप उडाला.

  • By नुपूर भगत
Updated On: May 08, 2026 | 08:57 AM
साहसी खेळ जीवावर बेतला! गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करताना दोर गळ्यात अडकला अन् तरुणीने समोर पाहिला यमराज

साहसी खेळ जीवावर बेतला! गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करताना दोर गळ्यात अडकला अन् तरुणीने समोर पाहिला यमराज

Follow Us
Follow Us:
  • साहसी खेळाचा आनंद घेताना महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून नेटकऱ्यांचा थरकाप उडाला.
  • समुद्राच्या मध्यभागी अचानक परिस्थिती बदलताच महिलेची धडपड कॅमेऱ्यात कैद झाली.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी साहसी खेळांमधील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
मागील काही काळापासून साहसी खेळांची क्रेझ भरपूर वाढली आहे. काहीतरी नवीन करावं यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालतात आणि असं काही करतात जे नक्कीच जीवास घातक ठरते. आपण दाखवलेल्या या साहसाने नेहमीच आपल्या धैर्याची प्रशंसा होत नाही तर यामुळे कधीकधी आपला जीव देखील धोक्यात पडतो. अशीच काहीशी घटना एका महिलेसोबत पॅराग्लयडिंग करताना घडून आली. महिला गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लयडिंग सारख्या साहसी खेळाचा आनंद लुटायला गेली होती पण तिचा हाच आनंद एका वाईट अनुभवात परावर्तित झाला. तिच्यासोबत घडलेल्या घातकी प्रकाराचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केला असून यात ती जीवंत राहण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपडताना दिसून आली. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

अभिमानास्पद! अंदमानच्या समुद्रात भारतीयांनी रचला नवा इतिहास; पाण्याखाली उभारला सर्वात उंच मानवी पिरॅमिड, गिनीज बुकमध्ये नोंद

काय घडलं व्हिडिओत?

घडलेला हा सर्व प्रकार गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. साहसी खेळ खेळण्याच्या नादात महिलेचा जीव धोक्यात आला आणि तिने आयुष्यातील सर्वात वाईट क्षणांचा अनुभव घेतला. व्हिडिओत दिसते की, पाण्याच्या मधोमध बोटला रश्शी बांधून महिला पॅराग्लायडिंगची मजा लुटत आहे. पण काही क्षणातच परिस्थिती बिघडते आणि ती हवेत उडण्याऐवजी पाण्यात डुबु लागते. पॅराग्लायडिंगचा दोर तिच्या गळ्याजवळ आलेला असतो जे पाहून ती घाबरते, वाचण्यासाठी धडपड करते आणि हे संपूर्ण दृष्य पाहणे थरारक ठरते. सुदैवाने महिलेचा जीव या परिस्थितीतून वाचला पण हा जीवघेणा अनुभव तिच्या मनात दडून राहिला.

जणू यमराजांनाच दिलं खुलं आव्हान! लाटांच्या खवळलेल्या प्रवाहात तरुण करु लागला मस्ती, पाहून यूजर्सना भरली धडकी; Video Viral

महिलेने @dt_sushmitha_br_gowrav नावाच्या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओला शेअर केले आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने सांगितले की, केवळ एका क्षणाच्या थरारासाठी तिने सर्वस्व पणाला लावले. या साहसाची सुरुवात जरी खूप मजेत झाली असली, तरी तिचा आनंद लवकरच दहशतीत बदलला. समुद्राच्या मध्यभागी असताना, एक दोर तिच्या गळ्याभोवती अडकला. त्या क्षणी तिला वाटलेली भीती शब्दात वर्णन करणे कठीण आहे. तिची सुटका झाल्यामुळे ती खूप नशीबवान होती. मात्र, अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही. जर तुम्ही कोणताही जलक्रीडा प्रकार करत असाल, तर तो करण्यापूर्वी तुम्ही सुरक्षेची खात्री करून घेतली पाहिजे. महिलेचा हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार ट्रेंड करत असून यातून आपल्याला शिकवण मिळते की, कधीही कोणता साहसी खेळ खेळताना पहिले आपल्या जीवाची काळजी घ्यायला हवी.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman faces danger during paragliding in goa video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • Goa
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
3

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
4

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.