(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडियाच्या अनेक प्लॅटफाॅर्म्सवर या विक्रमाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात आपण पाहू शकतो की, समुद्राच्या आत खोल पाण्यात कशाप्रकारे मानवी पिरॅमिड साकरण्यात आला. डायव्हर्सच्या एका तुकडीने मोठ्या धैर्याने या विक्रमाला पूर्णत्वास आणले. हा जगातील सर्वात उंच मानवी मनोरा अदंमान-निकोबार येथील स्वराज्य बेटावर बनवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज्य बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॅवलॉक बेटावर रविवारी ३ मे २०२६ रोजी हा पराक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला. माहितीनुसार, नायब राज्यपाल डी. के. जोशी यांच्यासह १४ जणांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि २२.३ मीटर उंचीचा मानवी पिरॅमिड उभारला. इतकेच नाही, तर ते तीन मिनिटे पाण्याखाली राहिले.
View this post on Instagram
A post shared by Andaman and Nicobar Tourism (@andaman_and_nicobar_tourism)
हातात वरमाला घेऊन तयार होता वर, वधूने उडी मारत भरमांडवातून काढला पळ, लग्नसमारंभातील Video Viral
हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, अंदमान आणि निकोबार येथील प्रशासनाने केवळ दोन दिवसांतच दोन पराक्रम करुन दाखवले. या दोन्ही विक्रमांचा उद्देश या बेटांना जागतिक स्तरावरील एक प्रमुख ‘डायव्हिंग पर्यटन स्थळ’ म्हणून प्रसिद्धी देणे हा आहे. या विक्रमाची आता जगभर चर्चा होत असून देशात याचे व्हिडिओज चांगलेच ट्रेंड करत आहेत.इंस्टाग्रामवर @andaman_and_nicobar_tourism नावाच्या अधिकृत अकाऊंटवरुन या विक्रमाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या विक्रमाची सर्व माहिती देण्यात आली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






