(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
मुलाचा आपल्यावरील विश्वास तपासण्यासाठी वडील त्याला छतावरुन खाली उडी मारायला सांगतात. वडील खाली उभे राहून त्याला झेलण्यासाठी हात पुढे करुन उभे असतात, त्यांना विश्वास असतो की, ते आपल्या मुलाला खाली पडू देणार नाहीत. एवढंच काय तर त्याच्या सुरक्षेसाठी खाली वडिलांनी बिछाना देखील पसरवलेला असतो. शेवटी अखेर तो क्षण आलाच चिमुकल्याने न घाबरता घराच्या छतावरुन उडी मारली आणि खाली पडताच वडिलांनी त्याला हातात झेलले. शेवटी दोघांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटते आणि दृश्य सर्वांचेच मन जिंकते. इतक्या लहान वयातच मुलाचा आपल्या वडिलांवर असलेला विश्वास पाहून यूजर्स खुश झाले आहेत. अनेकजण विविध प्रतिक्रियांसह मुलाच्या आत्मविश्वासाबद्दल त्यांचे कौतुक करत आहेत तर काहीजण याला निष्काळजीपणा आणि धोकादायक कृत्य असल्याचे मानत आहेत.
बेटी को बचाने की जिम्मेदारी अगर पिता ले तो बेटी के मन से यमराज का खौफ भी निकल जाता है ,, pic.twitter.com/knIcLkTR6L — TANVIR RANGREZ (@virjust18) January 17, 2026
दरम्यान हा व्हिडिओ @virjust18 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण हे खूप धोकादायक असू शकते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ हा मूर्खपणा आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पण ते धोकादायक आहे; एक छोटीशी चूक देखील धोकादायक असू शकते. वडिलांचा विश्वास बरोबर असला तरी, त्यामुळे दुखापत देखील होऊ शकते.”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






