(फोटो सौजन्य: Instagram)
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार, केरळच्या शिमजिथा मुस्तफा या महिलेने बसमधील एका १८ सेकंदांच्या व्हिडिओद्वारे दीपक नावाच्या व्यक्तीवर छेडछाडीचा खोटा आरोप लावला होता. महिलेने चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला ज्यानंतर व्हिडिओ व्हायरल होताच दीपकवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. परिणामी मानसिक तणावाखाली येऊन दीपकने आत्महत्या केली. या घटनेनंतर आता केरळच्या पुरुषांनी प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करत बसमध्ये कार्डबोर्ड घेऊन प्रवास करतानाचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. अलीकडे पुरुषांवर होणारे चुकीचे आणि खोटे आरोप वाढत असल्याने भविष्यात आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून पुरुषांनी हे नवे पाऊल उचलले आहे.
दरम्यान दीपकच्या आत्महत्येनंतर अनेकांनी महिलेवरही टीका करण्यास सुरुवात केली. सोमवारी, पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल इन्फ्लूएंसर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. केरळ राज्य मानवाधिकार आयोगानेही या घटनेची पोलिस चौकशी करण्याचे आदेश दिले आणि उत्तर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) यांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे या घटनेनंतर महिलेच्या अकाऊंटवरून त्या व्हिडिओला डिलीट करण्यात आले आणि तिने आपली बाजू मांडत एक दुसरी क्लिप अपलोड केली. पण नंतर या क्लिपलाही खासगी करण्यात आले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






