Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! ट्रेनमध्ये लेडी पॉकेटमारचा थरार; डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मोबाईल लंपास, चोरीचा लाईव्ह VIDEO VIRAL

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. यावर गेल्या काही काळात अनेक धक्कादायक घटनांचे व्हिडिओही पाहायला मिळत आहे. सध्या एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून एक महिला पॉकेटमारने चोरी केल्याची घटना आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2026 | 01:47 PM
women steal mobile phone

women steal mobile phone

Follow Us
Follow Us:
  • ट्रेनमध्ये लेडी पॉकेटमारचा थरार
  • डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मोबाईल लंपास
  • चोरीचा लाईव्ह VIDEO VIRAL
रेल्वेने प्रवास करताना अनेकदा चोरीच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा पाहिल्याही असतील. अनेकदा गर्दीच्या ठिकाणी तरुण मुले किंवा पुरुषमंडळी लोकांचे पाकीट, मोबाईल फोन, दागिने लंपास करताना दिसतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक ट्रेनमधील मोबाईल चोरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे चोरी एका महिलेने केली असून तिने अत्यंत सफाईने हात मारलेला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.

सावधान! मलाई समजून विष तर खात नाही ना? ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीनच सरकेल

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे. काही प्रवासी ट्रेनच्या दरवाजात उभे राहिलेले आहेत. येथेच एक महिला देखील ट्रेनच्या दरवाज्या दवळच्या डब्ब्यात सीटजवळ उभी आहे. याच गर्दीत एक व्यक्ती अप्पबर बर्थच्या कोपऱ्यात बसलेला आहे. या तरुणाच्या ठीक बाजूलाच ही निळ्या साडीतील महिला उभी आहे. ही महिला ट्रेनमधील परिस्थितीचा अंदाज घेत, धक्काबुक्कीचाचा फायदा घेत हळूहळू तरुणाच्या जवळ जाते.

तरुणाच्या जवळी जाऊन आपले हात पाठीमागे करते. याच वेळी ट्रेनला अचानक हलका धक्का बसतो. हीच संधी साधून महिला अत्यंत हात सफाईने तरुणाच्या खिशातून महागडा मोबाईल काढून घेते. याचा कोणाला संशयही येत नाही. यानंतर महिला फोन साडीत लपवते आणि शांतपणे उभी राहते. धक्कादायक म्हणजे त्या तरुणाला देखील त्याचा फोन चोरीला गेल्याचे लक्षात येत नाही.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @comedycrest.in या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या चोरीचा व्हिडिओ ट्रेनमधीलच एका प्रवाशाने रेकॉर्ड केला असून हा व्हिडिओ तुफान वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले असून लोकांनी रेल्वेत प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ही घटना नेमकी कुठे घडली याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

क्या चोर बनेगा रे तू! चोरी करायला गेला अन् थेट ४ मजल्यावरच अडकला; कॉलनीतील रहिवाशांनी केली सुटका, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Women steal mobile phone from train passenger video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
1

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
2

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
3

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
4

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.