सावधान! मलाई समजून विष तर खात नाही ना? 'हा' VIDEO पाहून पायाखालची जमीनच सरकेल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एका व्हायरल व्हिडिओमध्ये थेट टिश्यू पेपर वापरुन मलाई तयार केली जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे आणि प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या भांड्यात दूध भरलेले दिसत आहे. यानंतर एक व्यक्ती हातात टिश्यू पेपरचा बंडल घेऊन दूधात टाकत आहे. दूधात टाकल्यावर कागद अगदी हुबेहुब जाड आणि पांढऱ्या शुभ्र मलाईसारखा दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच मोठा वाद पेटला आहे. ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आणि बनावट मलाई तयार केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मलाईदार दुधाच्या नावाखाली लोकांना टिश्यू पेपर टाकून दिले जात आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकते असे लोकांचे म्हणणे आहे. मात्र, या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
यही बाकी रह गया था 😱 आपके मार्केट वाले दूध में कही मलाई की जगह टिशू पेपर तो नहीं है दूध पीने के समय मलाई चेक जरूर करें नकली तो नहीं pic.twitter.com/wdPSJItJot — KUNDAN PATEL (@KUNDAN00PATEL) July 11, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @KUNDAN00PATEL या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया केल्या असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी यावर कारवाईची मागणी केली आहे.
तर काहींनी हा कोणत्या तरी टिव्ही सिरियल किंवा चित्रपटाच्या शूटिंगचा भाग असण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. सेटवर नकली दूध दाखवण्यासाठी ही ट्रिक वापरली जाते. सध्या याबाबत चौकशीची मागणी होत असून हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






