माझं लग्न लावून द्या, नाहीतर..., प्रियकरासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी; संपूर्ण गावात एकच गोंधळ, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, प्रियकराशी लग्नाच्या हट्टापायी एक तरुण थेट उंच पाण्याच्या टाकीवर चढली आहे. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तरुणी टाकीवर चढून गोंधळ घालत आहे. तरुणी टाकीच्या अगदी टोकावर उभी राहिलेली आहे. तिला पाहण्यासाठी गावकऱ्यांची भलीमोठी गर्दी जमलेली आहे. तिचा हा अवतार पाहून लोकही गोंधळात पडले आहेत.
खाले उभे असलेले लोक तिला उतरण्याची विनंती करत आङे. मात्र तरुणी कोणाचेही ऐकायला तयार नाही. ती केवळ एकच रट लावली आहे. माझं लग्न माझ्या प्रियकराशी लावून द्या. तर मी खाली येणार असे ती म्हणत आहे.
प्रेमी से शादी की जिद को लेकर पानी की टंकी पर चढ़ी युवती, पीलीभीत से सामने आया वीडियो pic.twitter.com/t7HFkL647E — आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) May 12, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AnathNagrik या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. परंतु अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या व्हिडिओला सध्या लाखो लोकांनी पाहिले आहे. यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने, बसंती आपल्या वीरुसाठी पाण्याच्या टाकीवर चढली असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अशा मुली मिळतात कुठे? असा प्रश्न केला आहे. तर आणखी एकाने माझी वाली कधी असे करेल का माझ्यासाठी? असे विचारले आहेत. सध्या या व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






