Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचे उल्लंघन; फ्लोरिडा रिसॉर्टवरून 3 नागरी विमानांचे उड्डाण

Airspace Breach: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडायेथील पाम बीच येथील मार-ए-लागो रिसॉर्टच्यावरील हवाई क्षेत्राचे उल्लंघन झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2025 | 11:04 AM
3 Planes Breach Airspace Over Donald Trump's Mar-A-Lago resort

3 Planes Breach Airspace Over Donald Trump's Mar-A-Lago resort

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडायेथील पाम बीच येथील मार-ए-लागो रिसॉर्टच्यावरील हवाई क्षेत्राचे उल्लंघन झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन सिव्हिलियन विमानांनी प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश केला, त्यानंतर उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) ने F-16 लढाऊ विमाने पाठवून त्यांना हवाई हद्दीतून बाहेर काढण्यात आले. या विमानांनी हवाई क्षेत्रात प्रवेश का का केला होता याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फेब्रुवारीत हवाई उल्लंघनाच्या घटना

मीडिया रिपोर्टनुसार, स्थानिक वेळेनुसार, सकाळी 11: 05, दुपारी 12:10 आणि 15:50 विमानांनी रिसॉर्टवरुन उड्डाण केले. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यातही अशा घटना वारंवार घडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये असताना तीन वेळा हवाई क्षेत्राचे उल्लंघन झाले होते. 15 फेब्रुवारीला दोन वेळा आणि 17 फेब्रुवारीला राष्ट्रपती दिनीही अशा घटना घडल्या होत्या. ट्रम्प यांच्या इस्टेट भेटींदरम्यान अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, उल्लंघन करणारी तीनही विमाने सिव्हिलियन होती, या अनधिकृत विमानांनी एकामागून एक प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) ला F-16 लढाऊ विमाने पाठवावी लागली. या लढाऊ विमानांनी सिव्हिलियन विमानांना तातडीने बाहेर जाण्याचा इशारा दिला.

जागतिक घडामोडी संंबंधित बातम्या- Trump and Israel : अमेरिकेचा इस्रायलशी मोठा करार, लष्करी ताकद वाढणार; मोठ्या प्रमाणावर शस्त्रे विकण्यास मान्यता

फ्लेयर्सचा वापर करुन कारवाई

F-16 लढाई विमानांनी या सिव्हिलियन विमानांना हवाई क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी फ्लेयर्सचा वापर केला. फ्लेयर्स हे एक प्रकारचे प्रकाशमान सिग्नल असतात. हे सिग्नल्स कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण न करता पायलटला योग्य दिशेने जाण्याचा इशारा देतात. मीडिया रिपोर्टनुसार, लढाऊ विमानांनी ही कारवाई पूर्ण केल्यानंतर ट्रम्प सुरक्षितपणे मार-ए-लागो रिसॉर्टवर पोहोचले.

ही घटना सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी चिंता निर्माण करणारी आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष किंवा माजी राष्ट्राध्यक्ष राहत असलेल्या ठिकाणी, अत्यंत कडक सुरक्षाबंदोबस्त असते. यामुळे सिव्हिलयन विमानांचे वारंवरा होणार उल्लंघन तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

तात्पुरती उड्डाण निर्बंध लागू

सध्या ट्रम्प यांच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून अशा घटना वारंवार घडत असल्याने मास-ए-लागो रिसॉर्टच्या आसपास उड्डाण निर्बंध लागू करण्यात आले आहेत. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार परवानगीशिवाय सिव्हिल विमाने आणि ड्रोन या परिसरात उड्डाण करु शकत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जगावर युद्धाची टांगती तलवार! रशियाचा गंभीर इशारा, होऊ शकते ‘अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये युद्ध’

Web Title: 3 planes breach airspace over donald trumps mar a lago resort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

जॉर्जिया मेलॉनीच्या राज्यात महिला असुरक्षित? अहवालातून स्री हत्येची धक्कादायक आकडेवारी समोर
1

जॉर्जिया मेलॉनीच्या राज्यात महिला असुरक्षित? अहवालातून स्री हत्येची धक्कादायक आकडेवारी समोर

ना भूकंप, ना वादळ… तरीही धडाधडा कोसळतायत ‘या’ देशातील इमारती, काय आहे कारण?
2

ना भूकंप, ना वादळ… तरीही धडाधडा कोसळतायत ‘या’ देशातील इमारती, काय आहे कारण?

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
3

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

काँगो मंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; लँडिग दरम्यान गियर तुटला अन्…, भयावह VIDEO
4

काँगो मंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; लँडिग दरम्यान गियर तुटला अन्…, भयावह VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.