
Mexican Navy Plane
मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO
मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे लँडिगदरम्यान गॅल्वेस्टनमध्ये मेक्सिकन (Mexico) नौदलाचे हे विमान कोसळले. या अपघातची माहिती मिळताच अमेरिका आणि मेक्सिकोच्या सुरक्षा एजन्सींनी शोध आणि बचाव मोहिम सुरु केली होती. असोसिएडेट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, टेक्सासच्या स्थानिक वेळेनुसार, सोमवारी दुपारी वैद्यकीय रुग्णांना घेऊन जाणारे हे विमान कोसळले
टेक्सासमधील गॅल्वेस्टन खाडीच्या पाण्यात हे विमान कोसळले असून यामध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्यासह पाच जणांचा बळी गेल्याची माहिती अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जणांना वाचवण्यात आले आहे. यातील एकजण गंभीर जखमी असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचे टेक्सासच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
मेक्सिको नौदलाने या संदर्भात माहिती देताना म्हटले की, सोमवारी (२२ डिसेंबर) दुपारच्या वेळी (स्थानिक वेळेनुसार) गॅल्वेस्टन विमातळावर लँडिग होणार होते. परंतु यापूर्वीच विमान ह्युस्टनपासून ८० किलोंमीटर अंतरावर असलेल्या किनारी भागात तोल जाऊन कोसळले.
मेक्सिकोच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लष्कराचे विमान हे विमान एका वैद्यकीय मिशनवर होते. या विमानात मिचौ आणि माऊ फांऊडेशनचे दोन सदस्य होते. ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन संस्था असून ही संस्था गंभीर भाजलेल्या मेक्सिकन मुलांना मदत करते. या संस्थेचे दोन सदस्य एका चिमुकल्याला घेऊन वैद्यकीय मिशनवर निघाले होते. मात्र या दुर्घटनेत चिमुकल्यासह सदस्यांचाही मृत्यू झाला आहे.
सध्या विमानातील क्रू मेंबर्सची संख्या अस्पष्ट आहे. यासाठी चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच हा अपघात नक्की इंजिन बिघाडामुळे झाला की खराब हावामानामुळे झाला याची तपासणी देखील सुरु आहे. सध्या अपघाताच्या आसपासाचा संपूर्ण परिसरही सील करण्यात आला आहे
⚡️ Mexican plane with 6 crashes into Galveston Bay, Texas — rescue in progress pic.twitter.com/1TMSQndmbI — RT (@RT_com) December 22, 2025
Russia Aircraft Crash: रशियन विमानाचा आकाशातच झाला चक्काचूर; भयावह अपघाताचे दृश्य कॅमेरात कैद, VIDEO
Ans: अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या गॅल्वेस्टनमध्ये मेक्सिको नौदलाच्या विमानाचा अपघात झाला आहे.
Ans: अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या गॅल्वेस्टनमध्ये मेक्सिको नौदलाचे विमान तंत्रिक बिघाडामुळे लँडिंगदरम्यान कोसळले आणि अपघात झाला
Ans: मेक्सिको नौदलाच्या विमान अपघातात पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.