
Japan Earthquake
Japan Earthquake News in Marathi : टोकियो : एक मोठे संकट जपानसमोर (Japan) उभे राहिले आहे. जपानच्या पूर्वी किनारपट्टीवर ६.७ तीव्रतेचा मोठा भूकंप (Earthquake) झाला आहे. या भूकंपाचे केंद्र जपानच्या इवाते प्रांतातील यामादा शहरापासून १२६ किलोमीटर पूर्वेला १० किलोमीटर खोल होते. या भूकंपानंतर पाच आफ्टरशॉक बसले आहेत यामुळे त्सुनामीचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे.
अमेरिकेत बिश्नोई गॅंगच्या दोन कुख्यात गुंडांना अटक; भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु
भूकंपानंतर लगेचच, जपानच्या हवामान संस्थेने किनारी भागात त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. लोकांना किनारी भाग खाली करुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्यास सांगितले आहे. मियाको आणि यामादा किनारी भागांवर सुमारे एक मीटर उंचीच्या लाटांची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही
सुदैवाने सध्या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु काही भागांमध्ये लाटांमुळे भीतींना तडा गेला आहे. यामुळे सध्या परिस्थितीवर अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आले आहेत. जपानच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत जपानच्या इवाते प्रांतात सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहे.
पहिला भूकंप हा ६.७ रिश्टर स्केलचा होता, तर यापूर्वी ५.० तीव्रतेचे धक्के जाणवले. तसेच ५.४, ५.६, ५.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के देखील नोंदवण्यात आले आहेत. काल दिवसभरात जपानमध्ये सातपेक्षा अधिक मध्यम व मोठ्या तीव्रतेचे भूकंप नोदंवले असल्याची माहिती समोर आवली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, आणखी एखादा मोठा विनाशकारी भूकंप होण्याची शक्यता आहे. सध्या जपानच्या इवाते प्रांताच्या सरकारेन सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन संस्थांना अलर्ट जारी केला आहे. तसेच नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि पुढील सुचना येईपर्यंत सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जपान हा पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. या भागात पृथ्वीच्या भू-गर्भाखालील टेक्टोनिक प्लेट्स सतत हालचाली करत असतात. यामुळे या भागात सतत भूकंपा घडत असता. तसेच यामुळे त्सुनामीचाही मोठा धोका निर्माण होतो.
पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. ज्या फिरत राहतात. या प्लेट्स सतत एकमेकींवर आदळतात असतात. यामुळे घर्षण तयार होते, दाब तयार व्हायला लागतो. यामुळे प्लेट्स तुटू लागतात आणि ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधत असते. या कारणामुळे भूकंप होतो