अमेरिकेत बिश्नोई गॅंगच्या दोन कुख्यात गुंडाना अटक; भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेत लॉरेन्स बिश्नोईच्या जवळच्या गँगस्टर हॅरी बॉक्सरवर गोळीबार; गोदारा गँगने घेतली जबाबदारी
भारताच्या संरक्षण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, वेंकटेश गर्ग याला जॉर्जियामधून तर भानू राणा याला अमेरिकेतून अटक करण्यातआली आहे. या दोघांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच त्यांनी भारतात डिपोर्ट केले जाईल.
परदेशात भारताचे अनेक गुंड
सध्या भारतातील अंदाजे दोन डझनपेक्षा जास्त गुंड परदेशात लपून बसलेले आहे. परदेशातून त्यांचा गुन्हेगारीचा सिंडिकेट चालवत आहे. यामध्ये गोल्डी बराड, कपिल सांगवान, अनमोल बिश्नोई, हैरी बॉक्सर, आणि हिमांशु भाऊ या कुख्यात गुंडाचा समावेश आहे. हे गुंड पोर्तुगाल, कॅनडा, अमेरिका, इंग्लंड आणि यूएई यांसारख्या देशात राहून भारतात गुन्हेगारीचे जाळे पसरवत आहे. सोशल मीडिया द्वारे त्यांच्या गटात लोकांची भरती केली जात आहे.
वेंकटेश गर्ग
वेंकटेश गर्ग हा हरियाणाचा नारायणगडचा रहिवासी आहे. त्याच्यावर हत्या, लूटमार आणि खंडणी यांसारखे अनेक गुन्ह्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. वेंकटेश गुरुग्राम येथील बसपा नेत्याच्या हत्येच्या प्रकरणातही आरोपी आहे. या प्रकरणानंतर वेंकटेशने खोट्या पार्सपोर्टवर भारतातून पळ काढला होता आणि नंतर जॉर्जियात स्थायिक झाला. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकटेश जॉर्जियातून टोळीत शूटर्सची भरती करत होता. वेंकटेश गर्ग आणि कपिल सांवान दोघे मिळून आपला खंडणीचा व्यवसाय देखील चालवत होते.
भानू राणा
दुसरीकडे भानू राणा हा हरियाणाच्या करनालचा रहिवासी आहे. त्याचा कुख्यात बिश्नोई गॅंगशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. राणा बिश्नोई गॅंगला शस्त्र पुरवठा करण्याचे काम करत होता. हरियाणा पोलिसांनी राणाला
बेकायदेशीर शस्त्र विकानाता रंगेहाथ अटक केली. राणाचे नेटवर्क हरियाणा, पंजाब आणि दिल्लीपर्यंत असल्याचे सांगितले जाते. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.
भारताला या दोन कुख्यात गुंडाच्या अटकेमुळे मोठे यश प्राप्त झाले आहे. तसेच यामुळे परदेशातून भारतात चालवल्या जाणाऱ्या गुन्हेगारीला काहीसा आळा नक्कीच बसेल.






