Malaysia Flight
कुआलालंपुर : मलेशियाला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनला अचानक आग लागली. हे विमान मलेशियाला जाणार होते. या विमानात असलेल्या 138 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, विमानाच्या पायलटने प्रसंगावधान राखत हैदराबाद विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. त्यामुळे या इमर्जन्सी लँडिंगमुळे मोठी दुर्घटना टळली.
विमानाच्या इंजिनमध्ये मोठी आग लागल्याने हे लँडिंग करण्यात आले. याचा व्हिडिओही समोर आला आहे. पायलटने प्रसंगावधान राखत एटीसी अधिकाऱ्यांकडून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली आणि तत्काळ त्यांना परवानगी मिळाली. त्यानुसार, हैदराबाद विमानतळावर हे लँडिंग झाले. या अधिकाऱ्यांनी धावपट्टीवर अग्निशमन दल, रुग्णवाहिका, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे आदेश दिले. त्यानंतर विमान उतरताच इंजिनमधील आग विझवण्यात आली.
प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह विमानातील सर्व 138 लोक सुरक्षित आहेत. विमानाचे इंजिन दुरुस्त करण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले. मलेशिया एअरलाईन्सच्या MH-199 विमानाने गुरुवारी पहाटे उड्डाण केले आणि ते मलेशियातील क्वालालंपूर येथे उतरणार होते. मात्र, टेकऑफ झाल्यानंतर 14 मिनिटांनी विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली. त्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.