भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिले खाते उघडले आहे. प्रभाग समिती क्रमांक १७ ब मधील भाजपा उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. यानंतर कार्यकर्त्यांनी मानसरोवर येथील निवासस्थानी मोठा जल्लोष साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सुमित पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.