A video of Pakistani MP Sher Afzal Khan Marwat is going viral on social media platforms
इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे वादग्रस्त खासदार शेर अफजल खान मारवत यांच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण उपखंडात टीकेचे वारे जोरात वाहत आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या एका मुलाखतीत, मारवत यांनी युद्ध झाल्यास “मी इंग्लंडला पळून जाईन” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नागरिक, लष्करी तज्ज्ञ आणि राजकीय निरीक्षक संतप्त झाले असून सोशल मीडियावर त्यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
पत्रकाराने विचारलेल्या एका सोप्या प्रश्नाला उत्तर देताना, मारवत म्हणाले, “जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर मी थेट इंग्लंडला जाईन.” त्यांच्या या विधानावर पाकिस्तानी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकडे पाकिस्तानचे जवान सीमारेषेवर देशासाठी बलिदान देत आहेत, आणि दुसरीकडे एक खासदार स्वतःच्या सुरक्षेसाठी परदेशात पलायन करण्याची उघड घोषणा करत आहे – हे पाकिस्तानातील राजकीय नेतृत्वाच्या गंभीर असमर्थतेचे द्योतक आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. सामान्य नागरिकांपासून ते पत्रकारांपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर म्हणत आहेत की, “जेव्हा तुमचे खासदार स्वतः सुरक्षिततेसाठी पळण्याची भाषा करतात, तेव्हा लष्कराच्या जवानांचे मनोधैर्य कसे टिकेल?”
या व्हायरल व्हिडिओच्या दुसऱ्या भागात पत्रकाराने त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर मारवत यांनी अतिशय बेजबाबदार आणि हास्यास्पद विधान करत सांगितले की, “मोदी माझ्या मावशीचा मुलगा आहे, तो माझ्या सांगण्यावरून मागे हटेल.” या वक्तव्यावरून पाकिस्तानमधील राजकारण किती खालच्या पातळीवर पोहोचले आहे, हे स्पष्ट होते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेत्याविषयी अशा प्रकारचे विधान केल्याने, पाकिस्तानचा जगभरात फज्जा उडत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचा ‘हा’ सिक्रेट एअरबेस म्हणजे पाकिस्तानच्या घशात अडकलेला काटा, का? ते जाणून घ्या
शेर अफजल खान मारवत हे एकेकाळी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. मात्र, पक्षातील अंतर्गत मतभेदांनंतर त्यांनी इम्रान खान यांच्यावर वारंवार टीका सुरू केली, त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यांची ही वक्तव्ये पाहता, त्यांची राजकीय स्थैर्यताही प्रश्नचिन्हात आहे. सध्या ते स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अशा वादग्रस्त विधानांचा आधार घेत असल्याचे दिसते.
Journalist : Agar india ne attack kar diya to?
Shet Afzal Khan Marwat : To hum London bhag jayengeAfzal Khan is a senior terrorist in Pakistan.
Even they don’t trust their army. 😂 pic.twitter.com/LBmFQ1ysSr
— rae (@ChillamChilli) May 3, 2025
credit : social media
दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक मृत्युमुखी पडले. भारतीय गुप्तचर संस्थांनी यामागे पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे निष्कर्ष काढले आहेत.
हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत तीन महत्त्वाच्या आघाड्यांवर पाकिस्तानविरोधात पावले उचलली आहेत:
1. १९६०चा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या जलपुरवठ्यावर मोठा परिणाम होईल.
2. पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तू, मेल, पार्सल आणि शिपिंग सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोणतेही पाकिस्तानी जहाज आता भारतीय बंदरात येऊ शकणार नाही.
3. सर्व पाकिस्तानी अल्पकालीन व्हिसा रद्द करण्यात आले आहेत आणि संबंधित नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतावर केला दहशतवादाचा आरोप आणि स्वतःच्याच जाळ्यात अडकला पाकिस्तान; बनावट पुरावे आले समोर
शेर अफजल खान मारवत यांचे युद्धाविषयीचे वक्तव्य पाकिस्तानी राजकारणातील अस्थिरता आणि गंभीरतेचा अभाव अधोरेखित करते. अशा पळपुट्या विधानांमुळे पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय दर्जा आणखी घसरत आहे. याउलट, भारताने दहशतवादाविरोधात आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे, जी संपूर्ण जगासाठी एक संदेश आहे – की भारत आपल्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही.