Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood: नेपाळ-चीन पर्यटनाला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मोठी बातमी; ४५ जणांचा ग्रुप…

Nepal Flood: वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्ती नेपाळ मध्ये अडकलेल्या असल्याबाबतची माहिती अद्याप पर्यंत प्राप्त झालेली नाही. नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील 11 नागरिक काठमांडू येथे असून त्यांना मदतीसाठी आवश्यक असल्याने प्रयत्न केले जात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2026 | 02:13 PM
nepal flood

nepal flood

Follow Us
Follow Us:
  • काठमांडू व सागा (चीन ) येथे अडकलेल्यांच्या मदतीसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू
  • रायगड, अहिल्यानगर, नागपूर जिल्ह्यातील नागरिक परत येण्यासाठी सुरक्षितरित्या मार्गस्थ
  • राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली माहिती 
मुंबई: नेपाळमधील काठमांडू व चीनमधील सागा (चीन ) येथे पर्यटन साठी गेलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे प्रयत्न सुरू असून यादृष्टीने केंद्र सरकार, नेपाळ व चीन सरकारच्या माध्यमातून कार्यवाही करत असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार रायगड, अहिल्यानगर, नागपूर यासह अनेक ठिकाणचे नागरिक सुरक्षितरित्या परत येत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सचे टूर ऑपरेटर दर्शन गुंजाळ यांनी 45 जणांच्या ग्रुपमध्ये अहिल्यानगर (27) नाशिक(12), पुणे(5), मुंबई (1) जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती दिली. हा ग्रुप नेपाळ येथील चितवन येथे आहे. सर्वजण सुखरूप आहे. सदर ग्रुप नेपाळमधील लुंबिनी येथे पोहोचणार आहे. लुंबिनी येथे मुक्काम करून उद्या आयोध्याकडे निघणार असल्याचे गुंजाळ यांनी कळविले आहे.

ट्रॅव्हल्सच्या निर्मलाताई गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हा ग्रुप नेपाळमध्ये आहे. सर्व नागरिक सुखरूप आहेत.सद्यस्थितीत काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद असल्यामुळे ते लुंबिनीकडे जाणार असून तेथून पुढे आयोध्याकडे जाण्याचे त्यांचे नियोजन आहे. सद्यस्थितीत त्यांना असून त्यांनी शासन स्तरावरून मदतीसाठी प्रयत्न केले जात आहे.

नेपाळमध्ये आलेल्या पुरात आत्तापर्यंत 579 जणांचा मृत्यू; 1545 जणांना वाचवण्यात यश तर 1924 बेपत्ता

रायगड जिल्ह्यतील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने 37 व्यक्ती नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेल्या आहेत. सध्या सर्व जण सागा (चीन ) येथे सुरक्षित आहेत. त्यांचे काठमांडू येथून 29 रोजी भारतात परतण्यासाठी विमान आहे. सर्व जण पर्यायी मार्गने काठमांडूकड़े आज सकाळी रवाना झाले असून सायंकाळ पर्यंत काठमांडू एअरपोर्टला पोहचतील. ते उद्या येतील, अशी माहिती नातेवाईक दिलीप शेठ यांनी दिली आहे. सर्वांची तब्येत ठीक असून त्यांच्यापैकी दोघे डॉक्टर आहेत.

नागपूर जिल्ह्यातील सर्व १०६ नागरिक सुखरूप असून,नागपूर जिल्हा प्रशासन यांचा त्यांच्याशी सातत्याने संपर्क असून त्यांच्या सुरक्षित परतीच्या प्रवासाबाबत आवश्यक समन्वय व देखरेख करण्यात येत आहे.त्यापैकी ४ नागरिक विमानाने दिल्ली येथे सुखरूप पोहोचले असून, उर्वरित १०२ नागरिक बसमार्गे भारतात दाखल झाले आहेत.१०२ नागरिक बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यात असून, आज रात्री ते पटना येथे पोहोचून तेथे मुक्काम करणार आहेत. त्यानंतर उद्या २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजताच्या रेल्वेने पटना येथून नागपूरकडे रवाना होणार आहेत.

वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्ती नेपाळ मध्ये अडकलेल्या असल्याबाबतची माहिती अद्याप पर्यंत प्राप्त झालेली नाही. नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील 11 नागरिक काठमांडू येथे असून त्यांना मदतीसाठी आवश्यक असल्याने प्रयत्न केले जात आहेत.

Nepal Flood : त्रिशूलीच्या बोगद्यात मृत्यूशी झुंज; ३५० जणांची सुटका, १०० हून अधिक अजून अडकले

नागरिकांना आवाहन

या पार्श्वभूमीवर, नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

🔗 माहिती नोंदवण्यासाठी लिंक:

https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आला आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून मदतीसाठी 1070 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Administration efforts assist those stranded kathmandu china peoples come back india from nepal flood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • nepal
  • Nepal Flood

संबंधित बातम्या

नेपाळमध्ये अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन
1

नेपाळमध्ये अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral
2

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral

Nepal Flood : अचानक आलेल्या पुराचा कहर; मृतांचा आकडा ५३८ वर
3

Nepal Flood : अचानक आलेल्या पुराचा कहर; मृतांचा आकडा ५३८ वर

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था
4

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.