Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानचा कट! अफगाणिस्तानला भारताविरुद्ध वापरण्याचा रचला होता डाव? काय आहे नेमकं प्रकरण?

भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (१० मे) युद्धबंदी लागू झाली आहे. दरम्यान युद्धकाळात पाकिस्तानने अनेक खोट्या आणि दृष्ट चाली खेळल्या होत्या. पाकिस्तानने या युद्धात अफगाणिस्तानला देखील ओढण्याचा प्रयत्न केला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2025 | 11:15 PM
Afghanistan dismissed Pakistan's claim about Indian missile attack as baseless

Afghanistan dismissed Pakistan's claim about Indian missile attack as baseless

Follow Us
Close
Follow Us:

काबूल: भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (१० मे) युद्धबंदी करारा झाला. आतंर्गत दोन्ही देशांनी शस्त्रसंधी लागू केली. दरम्यान पहलगामच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात अणुयुद्धाची भीती निर्माण झाली होती. भारताच्या पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केल्याच्या कारवाईनंतर पाकिस्तान चवथाला होता. भारताला अणुयुद्धाची धमकी पाकिस्तानकजून दिली जात होती. दरम्यान या काळात जागतिक स्तरावर अनेक देशांनी पाकिस्तानची साथ सोडली. परंतु दूष्ट पाकिस्तानने खोटे बोल रचत अफगाणिस्तानला या युद्धात ओढण्याचा प्रयत्न केला होता.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानला संघर्षात ओढण्याचा प्रयत्न

दरम्यान पाकिस्तानने भारतासोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान अफगाणिस्तानला ओढण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने दावा केला होता की, भारताच्या हल्ल्याने अफगाणिस्तानचे नुकसान झाले आहे. तथापि पाकिस्तानच्या खोट्या मनसुब्यावर अफगाणिस्तानने पाणी फेरले. अफगाणिस्तानने भारताला खरा मित्र म्हणून संबोधले. तसेच भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान खोटे दावे केरत असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय भारताने देखील हे दावे खंडित केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानने अमेरिकेसमोर पसरले हात; ट्रम्प यांच्या ऑफरवर मानले आभार

पाकिस्तानने दावा केला होता की, भारताने अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. परंतु अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह खाविरजमी यांनी हा दावा फेटाळून लावले. त्यांनी म्हटले की, भारताने असा कोणताही हल्ला केलेला नाही, ना ही आमचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानचे दावे निराधार आणि खोटे आहेत. अफगाणिस्तानच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड्यावर पडला आहे.

भारत खरा मित्र

दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील पाकिस्तानचा हा दावा खंडित केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आता अफगाणिस्तानच्या लक्षात आले असेल की, त्यांचा खरा मित्र कोण आणि शत्रू कोण आहे? तसेच अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन कोणी केले आहे. पाकिस्तानच्या भारताविरोधात खोट्या अफवा पसरवण्याच्या दूष्ट हेतूला जगासमोर आणण्यात आले आहे. पाकिस्तान खोट्या अफवा पसरवून भारताची प्रतिमा खराब करण्याचा आणि इतर देशांना भारताविरुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.  हे विधान अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.

यामुळे सुरु झाले युद्ध…

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाचे वातवरण होते. या हल्ल्याविरोधात कारवाईची मागणी केली जात होती. हल्ल्याच्या वेळी लोकांना त्यांचा धर्म विचारुन हत्या करण्यात आली. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यामागचे कारणे म्हणजे पहलगाम हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना टीआरएफने घेतली होती.

यामुळे पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्याचे म्हटले जाते. यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा प्रशिक्षण केंद्रांना उद्ध्वस्त करुन टाकले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवथाळला. पाकिस्तानने भारताला धमक्या देण्यास सुरुवात केली. तसेच दहशतवाद्यांना शहीद म्हणून संबोधले. तसेच अनेक काळापासून दहशतवादाला पाठिंबा असल्याचेही अनेकदा स्पष्ट झाल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतावर अणु हल्ला करणार होता पाकिस्तान? NYT च्या दाव्याने उडाली एकच खळबळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Web Title: Afghanistan dismissed pakistans claim about indian missile attack as baseless

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 11:15 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले
1

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
2

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण
3

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा
4

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.