Afghanistan plans to build dams to cut water flow to Pakistan
काबूल: पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईने पाकिस्तान तिथर-बिथर झाला आहे. भारताने सुरुवातील पाकिस्तावर वॉटर स्ट्राईक करत सिंधू जल करार स्थगित केला आहे. तर दुसरीकडे आता अफगाणिस्तानने देखील पाकिस्तानचे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडियारिपोर्टनुसार, अफगाणिस्तानने पाकिस्तानकडे जाणाऱ्या कुणार नदीवर धरण बांधण्याची तयारी केली आहे.
तालिबान सरकारने आर्मी जनरल मुबिन कुनार यांनी सोमवारी (१९ मे) कुनार नदीवरील धरणाच्या बांधकामाची पाहणी केली. मुबिन यांनी तालिबान सरकारला कुनार नदीवर धरण बांधण्यासाठी आवाहन केले होते. त्यांनी म्हटले की, हे पाणी आमचे रक्त आहे आणि आम्ही आमचे रक्त बाहेर पडू देणार नाही. अफगाणिस्तानच्या लोकांसाठी पाणी रोखून ठेवणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या विजेच्या गरजा पूर्ण होतील आणि शेतीत वापर होऊ आपल्या देशाचे उत्पादन वाढेल.
तालिबान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, धरणाचे सर्वेक्षण आणि डिझाइनचे कार्य पूर्ण झाले आहे. तसेच बांधकामासाठी निधी उभारण्याचा देखील प्रयत्न सुरु आहे. तालिबानचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास, अफगाणिस्तानचे उर्जा आणि अन्न सुरक्षा सुधारण्यास मदत होईल. असा दावा तालिबानने केला आहे.
कुनार नदी ४८० किलोमीटर लांब आहे. ही नदी अफगाणिस्तानाच्या हिंदूकुश पर्वतरांगामधून वाहते आणि काबूल नदीत मिसळून पुढे पाकिस्तानत प्रवेश करते. सिंधू नदी प्रमाणेच कुनार नदीचे पाणी पाकिस्तानसाठी मुख्य जलस्त्रोत आहे. परंतु पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये यावर कोणताही द्विपक्षीय करार झालेला नाही. यामुळे अफगाणिस्तानला कुनार नदीवर धरण बांधण्यात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र यामुळे पाकिस्तानला पाण्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानने कुनार नदीवर धरण बांधल्यास पाकिस्तानला पाण्याचा पुरवठा कमी होईल. यामुळे पाकिस्तानच्या शेती आणि पाणीपुरवठ्यावर मोठ्या परिणाम होईल. आधीच भारताचा पाकिस्तानवर दबाव आहेच. पण अफगाणिस्तानच्या या निर्णयामुळे पाकिस्तान पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तडफडेल.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई केली. भारताने वॉटर स्ट्राईकचा मार करत सिंधू जल करारा स्थगित केला. तसेच चिनाब नदीवरील धरणाचे दरवाजे देखील बंद केली आहे. अशातच अफगाणिस्तानने कुनार नदीवर धरण बांधल्यास पाकिस्तान गंभीर संकटात अडकेल.