पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे पारडे जड? यूएस-चीन अहवालाच्या नापाक दाव्याने पुन्हा वादाची ठिणगी
इशाक दार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान हा खुलासा केला. त्यांनी म्हटले की, भारताने अवघ्या ३६ तासांता किमान ८० ड्रोन पाकिस्तानवर डागले होते. यातील बहुतेक ड्रोन पाडल्याचा दावा त्यांनी केला. परंतु हेही मान्य केले की यातील एका ड्रोनने पाकिस्तानच्या नूर-ए-खान एअरबेसला उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाल्याची कबुली देखील इशाक दार यांनी दिली. नूर-ए-खान एअरबेस हा पाकिस्तानचा सर्वात महत्त्वाच आणि प्रमुख लष्करी तळ आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान पाकिस्तानच्या इतर लष्करी तळांना देखील लक्ष्य केले होते. यामध्ये सरगोधा, रफीकी, जैकोबाबद, मुरीदके यांसारख्या तळांचा समावेश होता. इशाक दार यांनी या तळांची दुरुस्ती केली असल्याचे सांगितले परंतु उपग्रह छायाचित्रांमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याच वेळी भारताचे निवृत्त लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लो यांनी देखील पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी देखील यापूर्वी नूर खान एअरबेसवर भारतीय हल्ल्या झाल्याची कबुली दिली होती.
भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. या हल्ल्याने संपूर्ण भारतच नव्हे, तर जगही हादरले होते. या हल्ल्यानंतर भारतामध्ये संतापाची लाट उसळली होती. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तानला दहशतवादविरोधी कारवाई करण्याचा कठोर इशारा दिला. यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस संघर्ष सुरु होता, ज्यामध्ये पाकिस्तानची पळता भूई झाली होती.
पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल
Ans: भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. यामध्ये मुजफ्कराबाद, मुरीदके, बहावलपूर आणि कोटली यांसारख्या दहशतवादी ठिकाणांना उडवून दिले होते.
Ans: भारताने युद्धात पाकिस्तानची चिनी चे J-10 लढाभ विमान आणि अनेक पाकिस्तान लष्करी विमाने उद्ध्वस्त केली आहेत. चिनची संरक्षण प्रणाली देखील भारताने युद्धात नष्ट केली होती.
Ans: २२ एप्रिल रोजी भारताच्या जम्मु-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ नागरिक ठार झाले होते. यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबादार धरले होते. यामुळे दोन्ही देशात तीव्र युद्ध सुरु झाले होते.
Ans: २२ एप्रिल रोजी भारताच्या जम्मु-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता.
Ans: पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार भारताच्या हल्ल्यात ऑपरेशनि सिंदूरमध्ये रावळपिंडीतील नूर-ए-खान एअरबेरसचे नुकसान झाल्याचे आणि अनेक सैनिक जखमी झाल्याचे कबुल केले आहे.






