Air India flight divertd to Abu Dhabi due to Houthis missile attack on tel aviv airport
नवी दिल्ली: रविवारी (04 मे) इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर हुथींनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यात सहाजण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णलायता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला आहे. याच दरम्यान एअर इंडियाची एक फ्लाइट दिल्लीतून इस्रायलच्या तेल अवीव येथे जात होते. परंतु हुथींच्या हल्ल्यानंतर फ्लाइट अबू धाबीकडे वळवण्यात आली आहे. लॅंडिगच्या काही वेळापूर्वीच इस्रायलच्या तेल अवीव शहरातील विमानताळावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्याने प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला येमेनमधून झाला होता. यावेळी एअर इंडियाचे विमान फक्त एक तासाच्या अंतरावर होते. यानंतर येमेनेमधून हुथींनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्याची माहिती मिळताच विमान अबू धाबीकडे वळवण्यात. तसेच 6 मे पर्यंत तेल अवीव ला जाणाऱ्या सर्वा फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. इस्रायली पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्रे बेन गुरियन विमानतळाच्या अगदी जवळ पडले. यामुळे विमानतळावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. बेन गुरियन हे इस्रायलचे मुख्य विमानतळ आहे. या विमानतळावरुन अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवली जातात.
तथापि, एअर इंडियाच्या विमानाचा दौरा रद्द करण्यात आला आहे. लवकरच विमान दिल्लीला परतेल. परंतु अद्याप या घटनेवर एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळाने प्राधान्य देत सर्व हवाई वागतूक तात्पुरती स्थगित केली आहे. हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर तातडीने ही पावले उचलण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान बेन गुरियन विमानतळापासून केवळ एक तासाच्या अंतरावर होते. विमानात शंभरहून अधिक प्रवासी होते. अशा परिस्थिती विमान पोहोचल्यानंतर हल्ला झाला असतात तर मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली असती. विमान लॅंडिग स्थितीत असताना हल्ला झाला असता. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. सुदैवाने अशी कोणतीही दुर्घटना घडली नाही.
हुथी दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला रोखण्यात इस्रायली सुरक्षा दल अपयशी ठरले. यामुळे क्षेपणास्त्रे बेन गुरियन विमानतळावर पडले. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत.
दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याहल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असे म्हटले आहे. तसेच इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी बेन गुरियन हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी हुथींवर संताप व्यक्त केला असून सात वेळा हल्ल्याची धमकी दिली आहे.