Pahalgam Terror Attack: पाणी रोखण्याच्या बदल्यात पाकिस्तान करणार अणुहल्ला? पाक राजदूतांची पुन्हा पोकळ धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार रद्द केला आहे. तसेच भारताने पाकिस्तानवर डिजीटल स्ट्राईक केली. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे आणि चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान बिथरला आहे. वारंवार पाकिस्तानचे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांकडून भारताला पोकळ धमकी देत आहे.
पुन्हा एकदा रशियातील पाकिस्तानचे राजदूत मुहम्मद खालिद जमाली यांनी भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे. जमाली यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, भारताने सिंधू जल करार रद्द केला आणि पाकिस्तानचे पाणी अडवले किंवा पाकिस्तानवर हल्ला केला तर हल्ला करण्यास पुढेमागे पहणार नाही. भारताने एकही चूकीचे पाऊल उचलेले तर पाकिस्तान अणुहल्ला करने. दरम्यान भारताने एककीडे पाकिस्तानविरोधात कारवाया केल्या असूनही पाकिस्तानचे मंत्री पोकळ धमक्या देतच आहेत.
PAKISTAN GIVES A NUCLEAR THREAT
‘Pakistan will use the full spectrum of power, both conventional and nuclear’, Pakistan’s ambassador to Russia Jamali amid tension with India after the Pahalgam terror attack by Pakistani terrorists. pic.twitter.com/FzgsdDKhCD
— Sidhant Sibal (@sidhant) May 4, 2025
मॉस्कोतील पाकिस्तानी राजदूत जमाली यांनी म्हटले की, गुप्तचर संस्थाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारत पाकिस्तानवर हल्ला करणार हे निश्चित आहे. इस्लामाबादला याची माहिती मिळाली आहे. भारताने पाकिस्तानच्या काही भागात हल्ला करण्याची योजना आखल्याचे त्यांनी म्हटले. जमाली यांनी म्हटले की, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत काही दिवसांतच पाकिस्तानवर हल्ला करणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संभाव्य लष्करी कारवाई पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्ताने उच्चस्तरिय नेते आणि लष्करी अधिकारी भारताला एकामागून एक धमक्या देत आहेत. पाकचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा, बिलवाल भुट्टो यांनी भारताला धमकी दिली आहे. ख्वाजा यांनी अणु हल्ल्याची धमकी दिली आहे, तर भुट्टो यांनी सिंधू नदीत रक्तपाताची धमकी दिली आहे. दरम्यान पुन्हा एकदा रशियातील राजदूत जमाली यांनीही भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमापार दहशवादी आणि दहशतवादाला पाठिंब्यामुळे संताप व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना पाकव्याप्त पीओकेमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. यामुळे भारताने संतप्त होत पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली आहे. पाकिस्तान या हल्ल्यात आपला सहभाग असल्याचे नाकारले आहे. परंतु भारताला मिळालेल्या पुराव्यांमध्ये पाकिस्तानचा सहभाग आढळून आला आहे. यामुळे देशातून पाकविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.