इस्रायलनं गाझात केला एयरस्ट्राईक! रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात 500 नागरिकांचा मृत्यू, हमास आणि इस्रायलचा एकमेकांवर आरोप

हमासच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी आरोप केला की गाझा येथील हॉस्पिटलवर इस्रायली हवाई हल्ल्यात 500 लोक मरण पावले आहेत. त्याचबरोबर इस्रायली लष्कराने या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. तेल अवीव.

    इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा (Israel Hamas War) आज 12 वा दिवस आहे. हे युद्ध दिवसेंदिवस अधिक तिव्र होताना दिसत आहे. आता मंगळवारी इस्रायलने गाझा येथील रुग्णालयावर एयरस्ट्राईक (Airstrike On Hospital In Gaza) केला. या हवाई हल्ल्यात जवळपास 500 पॅलेस्टिनी ठार झाले. इस्रायलने या हॉस्पिटलवर हवाई हल्ला केल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, इस्रायलने हे आरोप फेटाळले असून हॉस्पिटलमध्ये हा स्फोट हमासच्या अयशस्वी रॉकेट प्रक्षेपणामुळे झाल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

     

    7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध (इस्रायल हमास युद्ध) सुरू झाले. त्यानंतर मंगळवारी हॉस्पिटलमध्ये झालेला स्फोट ही पहिलीच घटना आहे ज्यात एकाच वेळी इतक्या लोकांचा मृत्यू झाला आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. तेव्हापासून ही लढाई सुरू आहे. इस्रायलच्या हल्ल्यात 3500 पॅलेस्टिनी मारले गेले गाझामधील हमास संचालित सरकारमधील आरोग्य मंत्री माई अल्काईला यांनी इस्रायलवर नरसंहाराचा आरोप केला.

    गाझा नागरी संरक्षण प्रमुख म्हणाले की, हॉस्पिटलवरील हल्ल्यात 300 लोक मारले गेले. त्याचवेळी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील मृतांचा आकडा 3500 वर पोहोचला आहे. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 1300 लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने सुमारे 200 इस्रायली लोकांना ओलीस ठेवले आहे. हमासच्या अयशस्वी रॉकेट प्रक्षेपणामुळे रुग्णालयात स्फोट गाझा शहरातील अल-अहली अल-अरबी रुग्णालयात झालेल्या स्फोटाची जबाबदारी इस्रायली लष्कराने नाकारली आहे. इस्रायली लष्कराने सांगितले की, हॉस्पिटलमध्ये हा स्फोट हमासच्या अयशस्वी रॉकेट प्रक्षेपणामुळे झाला.