Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताशी पंगा घेणाऱ्या जस्टिन ट्रुड्रोंची डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली; म्हणाले…

अमेरिकेचे नवनिर्विचित राष्ट्राध्यक्षांच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला आता काही आठवडेच उरले आहेत. दरम्यान ट्रम्प त्यांच्या कोणत्या ना कोणत्या विधानामुळे सतत चर्चेचा विषय बनत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 26, 2024 | 05:51 PM
भारताशी पंगा घेणाऱ्या जस्टिन ट्रुड्रोंची डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली; म्हणाले...

भारताशी पंगा घेणाऱ्या जस्टिन ट्रुड्रोंची डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्विचित राष्ट्राध्यक्षांच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला आता काही आठवडेच उरले आहेत. दरम्यान ट्रम्प त्यांच्या कोणत्या ना कोणत्या विधानामुळे सतत चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा कॅनडाच्या जस्टिन ट्रुडोंची खिल्ली उडवली आहे. ट्रम्प यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने ट्रुडोंना “पागल वामपंथी” म्हणून संबोधले आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले असून ट्रुडोंना धक्का बसला आहे.

कॅनडाला अमेरिकेचा 51 वां भाग बनण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा

तसेच ट्रम्प यांनी कॅनडावर जास्त दराच्या करांचा दबाव टाकण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर, कॅनडाला अमेरिकेत सामील करून 51वे राज्य बनवण्याचा प्रस्ताव पुन्हा मांडला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे की, कॅनडाने अमेरिकेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना 60 टक्के करसवलत दिली जाईल, यामुळे कॅनडाची अर्थव्यवस्था दुप्पट वेगाने प्रगती करेल. त्यांनी कॅनडाचा गव्हर्नर बनवण्याचा प्रस्तावही ट्रूडो यांना दिला आहे. ट्रम्प यांच्या या आक्रमक विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- PAK सरकारसोबत चर्चा करण्यास इम्रान खान यांनी दर्शवली तयारी; ‘या’ अटी कराव्या लागतील मान्य

पनामा नहरही चर्चेत

डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष केवळ कॅनडावरच नाही, तर पनामा नहर पुन्हा अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आणण्यावरही आहे. ख्रिसमसच्या दिवशी ट्रम्प यांनी अनेक आक्रमक अशा पोस्ट केल्या असून, यामध्ये त्यांचा सर्वात चर्चित संदेश कॅनडाबद्दल होता. त्यांनी म्हटले की, “न्यायालयीन प्रक्रिया आणि निवडणुकांमध्ये अडथळा आणणाऱ्या कट्टर वामपंथी पागलांना ख्रिसमसच्या शुभेच्छा.”

ट्रूडो अडचणीत

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा 51वे राज्य करण्याच्या ऑफरमुळे ट्रूडो अडचणीत आले आहेत. त्यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिलेला नसला तरी मान्यही केलेले नाही. यापूर्वी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीदरम्यानही ट्रम्प यांनी याच प्रस्तावाचा उल्लेख केला होता. आता या विषयावर कॅनडामध्ये राजकीय उलथापालथ होत आहे.

अमेरिकेच्या उद्दिष्टांचा आक्रमक पाठपुरावा

ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे अमेरिकेची आंतरराष्ट्रीय रणनीती अधिक स्पष्ट होत आहे. कॅनडाला 60 टक्के करसवलतीचा प्रस्ताव दिल्याने कॅनडाच्या नेतृत्वावर प्रचंड दबाव येऊ शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला वेग मिळेल, परंतु सार्वभौमत्वाचे नुकसान होईल, अशी भीती कॅनडाने व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आक्रमक राजकीय पावलांमुळे कॅनडा आणि अमेरिकेतील संबंध अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. ट्रूडो यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाच्या युक्रेनवरील मिसाइल-ड्रोन हल्ल्यांची जो बायडेनने केली तीव्र शब्दांत निंदा म्हणाले…

Web Title: America canada news donald trump mocks justin trudeau by offering canada to become 51st us state says nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 05:51 PM

Topics:  

  • Canada
  • Donald Trump
  • Justin Trudeau
  • World news

संबंधित बातम्या

Trump-Putin Meeting: अलास्कामधील ट्रम्प-पुतिन भेटीचे गुपित उघड; करार नाही पण रशियाने 2.2 कोटी रोख दिल्याने चर्चेला उधाण
1

Trump-Putin Meeting: अलास्कामधील ट्रम्प-पुतिन भेटीचे गुपित उघड; करार नाही पण रशियाने 2.2 कोटी रोख दिल्याने चर्चेला उधाण

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
2

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
3

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
4

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.