फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यकाळ समाप्तपूर्वी जो बायडेन प्रशानात अनेक मोठे निर्णय घेत आहेत. दरम्यान त्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. जो बायडेन यांनी रशियाच्या युक्रेनवरील मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. बायडेन यांनी म्हटले आहे की, रशिया उक्रेनच्या ऊर्जा यंत्रणेला लक्ष्य करून तेथील नागरिकांना थंडीत विजेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाले आहे.
सैनिकी आणि शस्त्रास्त्र मदतीत लवकरच वाढ होणार
दरम्यान, बायडेन यांनी युक्रेनला सैनिकी मदत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेने मागील काही महिन्यांत युक्रेनला शेकडो मिसाइल्स पुरवले आहेत. याशिवाय ही मदत लवकरच अधिक वाढवली जाईल असे म्हटले जात आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाला शस्त्रसामग्रीची पुरवठा प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बायडेन यांनी इतर देशांनाही युक्रेनला मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, युक्रेनच्या नागरिकांना शांततेने आणि सुरक्षिततेने जगण्याचा हक्क आहे.
रशियाचा युक्रेनवरील हल्ला
रशियाने 78 मिसाइल्स आणि 106 ड्रोनच्या सहाय्याने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ला केला. या हल्ल्यात 1 व्यक्तीचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले आहेत. सर्वाधिक हल्ले खारकीव शहरावर करण्यात आले. तसेच निप्रो, क्रेमेन्चुक, क्रिवी रिह आणि इव्हानो-फ्रँकिवस्क या ठिकाणांवरही हल्ले केले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनच्या ऊर्जा केंद्रे आणि निवासी भागांना लक्ष्य केले आहे. खारकीवचे गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शहरावर किमान 7 मिसाइल्स डागण्यात आल्या आहेत, ज्यामुळे 6 नागरिक जखमी झाले. हल्ल्यांनंतर युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
झेलेन्स्की यांचा पुतिनवर आरोप
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाच्या या कृतीला ‘अमानवीय’ म्हटले आहे. त्यांनी पुतिन यांना ‘क्रूर व्यक्ती’ असे संबोधून आरोप केला आहे की, त्यांनी मुद्दाम ख्रिसमसच्या दिवशी हल्ला केला. युक्रेनच्या सर्वात मोठ्या ऊर्जा कंपनी DTEK ने सांगितले की, हा रशियाचा ऊर्जा प्रणालीवर 13वा मोठा हल्ला आहे. तर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितले की, युक्रेन केलेल्या हल्ल्यामुळे, रशिया कठोर पावले उचलत आहे. याआधी, युक्रेनने रशियाच्या कझान शहरावर ड्रोन हल्ले केले होते. रशिया-युक्रेनमधील वाढते तणाव जगभरातील शांततेसाठी गंभीर समस्या ठरत आहेत.