Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेची चिंता वाढली, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने 25 नागरिकांना सुनावली शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने 25 नागरिकांना शिक्षा सुनावली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत अमेरिका, युरोपीय संघ आणि इतर नेत्यांनी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 24, 2024 | 03:11 PM
अमेरिकेची चिंता वाढली, पाकिस्तानच्या लष्करी न्यालयाने 25 नागरिकांना सुनावली शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अमेरिकेची चिंता वाढली, पाकिस्तानच्या लष्करी न्यालयाने 25 नागरिकांना सुनावली शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने 25 नागरिकांना शिक्षा सुनावली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत अमेरिका, युरोपीय संघ आणि इतर नेत्यांनी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच अमेरिकेची चिंता देखील वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे 2023 मध्ये झालेल्या निदर्शनांमत सहभागी व्यक्तींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे अमेरिकेने तीव्र प्रतिक्रीया देत चिंता व्यक्त केली आहे.

काय म्हणाला अमेरिका? 

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मैथ्यू मिलर यांनी सांगितले की, पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयांमध्ये न्यायिक स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि योग्य प्रक्रियेचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी म्हटले, “9 मे 2023 रोजी पाकिस्तानमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल लष्करी न्यायालयाने 25 नागरिकांना शिक्षा सुनावली आहे, यामुळे आम्ही अत्यंत चिंतित आहोत. पाकिस्तानच्या संविधानात निष्पक्ष सुनावणी आणि योग्य प्रक्रियेच्या अधिकाराची हमी दिली आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी त्याचा आदर करावा.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Lawrence Bishnoi: ‘राम-राम, जय श्री राम’,लॉरेन्स बिश्नोई टोळीची आता कॅलिफोर्नियात दहशत; स्टॉकटनमधील गोळीबाराची घेतली जबाबदारी

The United States is concerned by the sentencing of Pakistani civilians in a military tribunal and calls upon Pakistani authorities to respect the right to a fair trial and due process.

— Matthew Miller (@StateDeptSpox) December 23, 2024


रिचर्ड ग्रेनल यांची प्रतिक्रीया

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे रिचर्ड ग्रेनेल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अमेरिकेने ही मागणी खूप उशिरा केली आहे आणि ती कमकुवत आहे. त्यांनी इमरान खानच्या त्वरित सुटकेची मागणी केली. ग्रेनेल यांनी असेही म्हटले की, “इमरान खान यांना अटक करून लोकशाही प्रक्रियेला धक्का दिला गेला आहे. पाकिस्तानमध्ये नवीन लोकशाही निवडणुका झाल्या पाहिजेत.”

भारतीय-अमेरिकन खासदार रो खन्ना यांनीही ग्रेनेलच्या या मागणीला पाठिंबा दिला. त्यांनी म्हटले, “मी ग्रेनेल यांच्याशी सहमत आहे. आता इमरान खान यांना सोडवण्याची आणि पाकिस्तानच्या जनतेला लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची वेळ आली आहे.”

युरोपियन संघाकडून देखील चिंता व्यक्त

युरोपियन युनियननेही यापूर्वी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयांच्या निर्णयांवर चिंता व्यक्त केली होती. युरोपियन युनियनने स्पष्ट केले की, लष्करी न्यायालयांचे हे निर्णय आंतरराष्ट्रीय नागरी आणि राजकीय अधिकार करार (ICCPR) अंतर्गत पाकिस्तानच्या जबाबदाऱ्यांशी विसंगत आहेत. ICCPRच्या कलम 14 नुसार प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र, निष्पक्ष आणि सक्षम न्यायालयात सुनावणीचा अधिकार आहे.

पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रितपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. लोकशाही, मानवाधिकार आणि न्यायव्यवस्थेचा आदर राखण्यासाठी पाकिस्तानने पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा जगभरातील नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- राष्ट्रीय सुरेक्षसाठी ग्रीनलॅंड खरेदी करण्याचा ट्रम्पचा प्रस्ताव; पंतप्रधान म्यूट एगेडे यांचा तीव्र विरोध म्हणाले, ‘आम्ही बिकाऊ…

Web Title: America concerned over sentencing of 25 civilians by pakistans military court know details nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • America
  • Imran khan
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
1

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
2

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा
3

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
4

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.