Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert: खाडीतील तणावाने गाठला धोक्याचा टप्पा; होर्मुझमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये चकमक, अमेरिकेने उडवले इराणचे रडार केंद्र

America Iran Drone Attack: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात तीव्र लष्करी संघर्ष उफाळून आला आहे. अमेरिकेने इराणचे चार ड्रोन पाडले असून, प्रत्युत्तर म्हणून त्यांच्या रडार केंद्रांवर हल्ला केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 06, 2026 | 09:08 AM
america iran war update strait of hormuz drone strike us destroys iranian radar trump claims 2026

america iran war update strait of hormuz drone strike us destroys iranian radar trump claims 2026

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझमध्ये थेट युद्ध
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
  • शांतता चर्चा संकटात

America Iran Military Conflict 2026 : मध्य पूर्वेमध्ये (Middle East) सुरू असलेला तणाव आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व आंतरराष्ट्रीय प्रयत्न धुळीस मिळवत अमेरिका आणि इराणचे सैन्य अखेर एकमेकांसमोर शिंगे रोखून उभे ठाकले आहे. जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त (Strait of Hormuz) दोन्ही देशांच्या नौदलामध्ये आणि हवाई दलामध्ये थेट लष्करी चकमक उडाली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या आक्रमक हालचालींना चोख प्रत्युत्तर देत अमेरिकेने मोठी लष्करी कारवाई केली आहे, ज्यामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात युद्धाचा भडका उडाला आहे.

लार्क बेटाजवळ पहिली ठिणगी आणि इराणचा इशारा

या ताज्या संघर्षाची सुरुवात शनिवारी सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील ‘लार्क बेटा’ (Larak Island) जवळ झाली. इराणच्या निम-सरकारी ‘मेहर’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या बंदर अब्बास या किनारी शहराजवळ तैनात असलेल्या अमेरिकी नौदलाच्या युद्धनौका संशयास्पद हालचाली करत होत्या. या हालचालींना रोखण्यासाठी इराणच्या सैन्याने चेतावणी म्हणून गोळीबार (Warning Shots) केला. इराणचा हा इशारा अमेरिकेने केवळ फेटाळलाच नाही, तर या चिथावणीखोर कारवाईनंतर इराणच्या मुख्य तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Chenab Tunnel : ₹2,352 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! हिमालयात 8.7 किमीचा बोगदा खणून भारत बदलणार नद्यांचा प्रवाह, पाकिस्तान बॅकफूटवर

अमेरिकेचा अंगावर येणारा पलटवार; ४ ड्रोन पाडले, रडार केंद्रे उद्ध्वस्त!

इराणच्या या पवित्र्यानंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने थेट आक्रमक मोहीम उघडली. अमेरिकी लष्कराने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, इराणने आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीला आणि अमेरिकी जहाजांना लक्ष्य करण्यासाठी अनेक आत्मघातकी ड्रोन पाठवले होते. यापैकी चार ड्रोन अमेरिकेच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केले. या ड्रोन हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने तात्काळ इराणच्या ‘गोरुक’ आणि ‘केशम’ बेटांवर असलेल्या किनारी निगराणी रडार केंद्रांवर (Coastal Surveillance Radar Centers) क्षेपणास्त्रांचा मारा केला. ही रडार केंद्रे आंतरराष्ट्रीय जहाजांवर पाळत ठेवण्यासाठी इराणचा मुख्य आधार होती, जी अमेरिकेने पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत.’

The United States said it intercepted four Iranian attack drones headed towards the Strait of Hormuz and later struck Iranian radar installations along the country’s southern coast, as President Donald Trump declared that Tehran’s nuclear ambitions would be stopped “one way or… pic.twitter.com/GpYmWfqDhE — The Statesman (@TheStatesmanLtd) June 6, 2026

credit – social media and Twitter

“इराणकडे आता फक्त २१-२२% क्षेपणास्त्रे शिल्लक!”  डोनाल्ड ट्रम्प

या भीषण लष्करी कारवाई सुरू असतानाच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका प्रमुख टीव्ही मुलाखतीत इराणच्या लष्करी क्षमतेबाबत अत्यंत मोठा आणि गोपनीय दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेच्या सातत्यपूर्ण आक्रमणामुळे इराणची लष्करी कंबर पूर्णपणे मोडली आहे. अमेरिकन गुप्तचर अहवालांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, इराणची शस्त्रसामग्री आता संपत आली असून त्यांच्याकडे केवळ २१ ते २२ टक्के क्षेपणास्त्रे शिल्लक राहिली आहेत. ट्रम्प यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, त्यांचे प्रशासन या संघर्षाच्या अंतिम आणि यशस्वी समाप्तीकडे वाटचाल करत असून, या युद्धात अमेरिकेचाच विजय निश्चित आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dark Eagle : शत्रूच्या रडारलाही चकवा देणारे अद्भूत शस्त्र; जाणून घ्या काय आहे अमेरिकेचा ‘Dark Eagle’ हायपरसॉनिक प्लॅन

शस्त्रसंधीची बोलणी फिस्कटली; परिस्थिती नियंत्रणाबाहेर

हा लष्करी संघर्ष अशा वेळी झाला आहे जेव्हा पडद्यामागे दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी (Ceasefire) घडवून आणण्यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू होते. मात्र, याच आठवड्यात कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या एका इराणी ड्रोन हल्ल्यात एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला होता, ज्याने अमेरिकेचा संयम संपवला. त्यातच इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये आणि इराण पुरस्कृत हिजबुल्लाहने कोणत्याही शांतता कराराला स्पष्ट नकार दिला आहे. या सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे होर्मुझमधील हा थेट संघर्ष आता संपूर्ण जगाला एका मोठ्या आर्थिक आणि लष्करी संकटात ढकलणारा ठरू शकतो, कारण या मार्गावरून होणारा जागतिक खनिज तेलाचा पुरवठा खंडित होण्याची भीती आहे.

Web Title: America iran war update strait of hormuz drone strike us destroys iranian radar trump claims 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • America
  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

WorldNews :जगाचे लागले लक्ष ,ट्रम्प सप्टेंबरमध्ये शी जिनपिंग यांच्याशी AI वर पहिली चर्चा करणार …
1

WorldNews :जगाचे लागले लक्ष ,ट्रम्प सप्टेंबरमध्ये शी जिनपिंग यांच्याशी AI वर पहिली चर्चा करणार …

InternationalNews :भारताचे टेन्शन वाढेल , अमेरिकन धार्मिक स्वतंत्रता आयोगाचे अध्यक्ष झाले पाकिस्तानी वंशाचे के डॉ असिफ
2

InternationalNews :भारताचे टेन्शन वाढेल , अमेरिकन धार्मिक स्वतंत्रता आयोगाचे अध्यक्ष झाले पाकिस्तानी वंशाचे के डॉ असिफ

Geopolitics :ट्रम्प-लेबनॉन भेट, इस्रायली सैन्य हटवण्याचा मुद्दा ऐरणीवर..
3

Geopolitics :ट्रम्प-लेबनॉन भेट, इस्रायली सैन्य हटवण्याचा मुद्दा ऐरणीवर..

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.