Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट

PM Modi-Meloni : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवल्याबद्दल त्यांनी मेलोनी यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांचे अभिनंदन केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 04, 2026 | 03:14 PM
PM Modi congratulates Giorgia Meloni Giorgia Meloni longest serving Italian Prime Minister

PM Modi congratulates Giorgia Meloni Giorgia Meloni longest serving Italian Prime Minister

Follow Us
Follow Us:
  • इटलीत ऐतिहासिक राजकीय टप्पा
  • पंतप्रधान मोदींचे खास अभिनंदन
  • स्थिरतेतून समृद्धीचा संदेश

आंतरराष्ट्रीय राजकारणात (PM Modi-Meloni) आपल्या धोरणात्मक निर्णयांनी आणि ठाम नेतृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्या नावे एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेल्या मेलोनी यांच्या सरकारने सलग १,४१३ दिवस पूर्ण केले आहेत. यासह, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इटालियन प्रजासत्ताकाच्या इतिहासात सर्वाधिक काळ सातत्याने सत्तेत राहणारे हे पहिलेच सरकार ठरले आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोनी यांचे मनापासून अभिनंदन केले असून, त्यांच्यातील मैत्रीमुळे भारत आणि इटली दरम्यानचे द्विपक्षीय संबंध एका नव्या उंचीवर पोहोचल्याचे अधोरेखित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) सोशल मीडिया हँडलवरून मेलोनी यांच्यासाठी एक विशेष आणि आपुलकीची पोस्ट शेअर केली. पंतप्रधान मोदींनी लिहिले, “माझ्या मैत्रिणी, इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचे इटलीच्या युद्धोत्तर इतिहासातील सर्वाधिक काळ सातत्याने सत्तेवर राहणाऱ्या पंतप्रधान ठरल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. हा ऐतिहासिक टप्पा म्हणजे इटालियन जनतेचा त्यांच्या कणखर नेतृत्वावर आणि दूरदृष्टीवर असलेला दृढ विश्वास व आत्मविश्वासाचे जिवंत प्रतीक आहे.” मोदींच्या या संदेशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही नेत्यांमधील ‘मेलोडी’ (Melodi) म्हणून प्रसिद्ध असलेल्या दृढ मैत्रीची आणि भारत-इटली युगाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO

विशेष सामरिक भागीदारी आणि समृद्ध भविष्याची ग्वाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केवळ मेलोनी यांच्या व्यक्तिगत यशाचा गौरव केला नाही, तर भारत-इटली यांच्यातील वाढत्या धोरणात्मक सहकार्यावरही भर दिला. त्यांनी पुढे लिहिले, “मेलोनी यांच्या मैत्रीपूर्ण दृष्टिकोनाने भारत-इटली विशेष सामरिक भागीदारी (Special Strategic Partnership) मजबूत करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दोन्ही देशांतील जनतेच्या समृद्ध भविष्यासाठी आणि जागतिक शांततेसाठी आमचे हे घनिष्ठ सहकार्य पुढेही असेच सुरू ठेवण्यास मी उत्सुक आहे. येत्या काळात त्यांच्या सातत्यपूर्ण यशासाठी आणि इटलीच्या प्रगतीसाठी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!”

Congratulations to my friend Prime Minister Meloni on becoming the longest continuously serving Prime Minister in Italy’s postwar history. This milestone is a reflection of the trust and confidence of the Italian people in her leadership. Her friendship has also been… — Narendra Modi (@narendramodi) September 4, 2026

credit – social media and Twitter

दुसऱ्या बाजूला, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या ऐतिहासिक कामगिरीनंतर अत्यंत नम्रतेने आणि जबाबदारीच्या भावनेने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करताना त्यांनी म्हटले की, इटालियन प्रजासत्ताकाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ टिकलेले सरकार चालवण्याचा बहुमान मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. मेलोनी यांनी स्पष्ट केले की, राजकीय स्थैर्य हा केवळ दाखवण्याचा किंवा मिरवण्याचा विक्रम नसतो, तर ती अशी एक मूलभूत स्थिती असते जी देशाला दीर्घकालीन नियोजन करण्यास, धाडसी आर्थिक निर्णय घेण्यास, जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा आदर वाढवण्यास मदत करते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indus Waters Treaty: ‘आम्ही चिनाब धरण मिसाइलने उडवून देऊ’; सिंधू पाणी करारावरून पाकिस्तानी पत्रकाराची भारताला अणूधमकी

आर्थिक प्रगती, आघाडीचे यश आणि नागरिकांचा विश्वास

आपल्या कार्यकाळाचा आढावा घेताना मेलोनी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत त्यांच्या सरकारने रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे, बेरोजगारीचा दर ऐतिहासिक ५ टक्क्यांपर्यंत खाली आणणे, लहान उद्योग व कुटुंबांना आर्थिक आधार देणे आणि देशांतर्गत सुरक्षा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इटलीची गमावलेली विश्वासार्हता पुनर्संचयित करण्यात यश आले आहे. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून, मध्य-उजव्या (Center-Right) विचारसरणीच्या संयुक्त आघाडीचा विजय आहे, जिने सत्ता टिकवण्यासाठी नव्हे तर देशाच्या विकासाचा एक सामायिक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकत्र काम केले आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

शेवटी, इटलीच्या नागरिकांचे आभार मानताना मेलोनी म्हणाल्या की, २०२२ मध्ये इटालियन जनतेने दिलेला कौल त्यांनी कधीही गृहीत धरला नाही. आगामी निवडणुकांमध्ये सरकार आपल्या कामाचा पूर्ण ताळेबंद घेऊन पुन्हा जनतेच्या दरबारात जाईल आणि पुढील प्रवासाचा निर्णय नागरिकच घेतील. सध्या बारी (Bari) येथे भव्य कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधून भविष्यातील योजनांवर काम सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला..

Web Title: Pm modi meloni modi congratulates giorgia meloni longest serving italian pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Georgia Meloni
  • PM Narendra Modi
  • World news

संबंधित बातम्या

World Economy : विकसनशील देशावर कर्जाचा ताण ;जागतिक बँकेच्या बैठकीत उपायांचा अभाव
1

World Economy : विकसनशील देशावर कर्जाचा ताण ;जागतिक बँकेच्या बैठकीत उपायांचा अभाव

US Elections 2026 : अमेरिकन राजकारणात हायटेक क्रांती! AI जाहिरातींवर तब्बल 1,300 कोटींचा खर्च; 80% वाटा एकट्या रिपब्लिकन्सचा
2

US Elections 2026 : अमेरिकन राजकारणात हायटेक क्रांती! AI जाहिरातींवर तब्बल 1,300 कोटींचा खर्च; 80% वाटा एकट्या रिपब्लिकन्सचा

Sadhguru: ‘तरुण पिढी द्वेषाने भरलेली, आपल्या संस्कारांमध्ये…’; अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्लाच्या कटावर सद्गुरूंचे भाष्य
3

Sadhguru: ‘तरुण पिढी द्वेषाने भरलेली, आपल्या संस्कारांमध्ये…’; अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्लाच्या कटावर सद्गुरूंचे भाष्य

US Temple Attack : अमेरिकेतील हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याचा कट उधळला; घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालय अन् एफबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये
4

US Temple Attack : अमेरिकेतील हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याचा कट उधळला; घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालय अन् एफबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.