Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amir Hamza : ‘यमदूत आला अन् गेम करून गेला’, हाफिज सईदचा ‘उजवा हात’ लाहोरमध्ये रक्ताच्या थारोळ्यात, भारताच्या शत्रूचा गेम ओव्हर

Pakistan News: लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लश्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य आणि भारताचा शत्रू असलेल्या अमीर हमजावर गोळीबार केला आहे. हाफिज सईदचा जवळचा सहकारी असलेल्या हमजाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 16, 2026 | 01:20 PM
amir hamza lashkar e taiba killed lahore unknown gunmen hafiz saeed aide 2026

amir hamza lashkar e taiba killed lahore unknown gunmen hafiz saeed aide 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • दहशतवाद्याचा अंत
  • भारताचा मोस्ट वॉन्टेड
  •  गूढ हत्यासत्र

Amir Hamza Lashkar-e-Taiba killed : पाकिस्तानच्या लाहोरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताविरुद्ध सतत विष ओकणारा आणि लश्कर-ए-तोयबाचा (LeT) संस्थापक सदस्य अमीर हमजा (Amir Hamza) याला अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. लाहोरमधील एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी हमजावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हमजाचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी गोटात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हाफिज सईदचा सर्वात जवळचा साथीदार

अमीर हमजा हा केवळ एक दहशतवादी नव्हता, तर तो लश्कर-ए-तोयबाचा मुख्य विचारवंत (Ideologue) मानला जात असे. हाफिज सईदसोबत मिळून त्याने या संघटनेची स्थापना केली होती. तो लश्करच्या प्रकाशनांचा प्रमुख होता आणि आपल्या भडकावू भाषणांनी तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यात त्याचा मोठा हात होता. २०१२ मध्ये अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. भारताविरुद्ध काश्मीरमध्ये झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांच्या मागे हमजाचा मेंदू होता, असे भारतीय गुप्तचर यंत्रणांचे मत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sicily Base : ‘धैर्यहीन नेत्या!’ ट्रम्प आणि मेलोनींची ‘केमिस्ट्री’ बिघडली; इटलीच्या ‘या’ एका निर्णयाने अमेरिका संतापली

लाहोरच्या रस्त्यावर अज्ञात हल्लेखोरांची दहशत

हा हल्ला इतका नियोजनबद्ध होता की हल्लेखोरांनी हमजाला निसटण्याची कोणतीही संधी दिली नाही. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार होण्यात यशस्वी झाले असून, पंजाब पोलिसांनी संपूर्ण भागाची नाकेबंदी केली आहे. विशेष म्हणजे, ज्या पद्धतीने हा हल्ला करण्यात आला आहे, ते पाहता पाकिस्तानात सुरू असलेले ‘अज्ञात हल्लेखोरांचे’ सत्र अधिकच तीव्र झाल्याचे दिसते. यापूर्वीही परमजीत सिंग पंजवड, शाहिद लतीफ आणि मुल्ला बहराम यांसारख्या भारतविरोधी दहशतवाद्यांचा अशाच प्रकारे पाकिस्तानात काटा काढण्यात आला आहे.

🚨🔴𝐋𝐚𝐝𝐢𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐠𝐞𝐧𝐭𝐥𝐞𝐦𝐞𝐧, 𝐲𝐨𝐮 𝐚𝐫𝐞 𝐬𝐭𝐢𝐥𝐥 𝐧𝐨𝐭 𝐫𝐞𝐚𝐝𝐲 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐢𝐬..
Unknown Gunmen carried out a targeted attack in Johar Town, Lahore.
LeT commander Amir Hamza was shot by unidentified assailants earlier today…🧵🧵 pic.twitter.com/Qza51Sh8ju
— THE UNKNOWN MAN (@Theunk5555) April 16, 2026

credit – social media and Twitter

भारतासाठी ही घटना महत्त्वाची का?

अमीर हमजा हा भारतीय लष्करावर आणि काश्मीरमधील नागरिकांवर झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार होता. लश्करच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य म्हणून तो संघटनेसाठी निधी जमा करणे आणि नव्या दहशतवाद्यांची भरती करणे ही कामे पाहत असे. त्याच्या मृत्यूमुळे लश्कर-ए-तोयबाच्या पायाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानात सुरक्षित वावरणाऱ्या या दहशतवाद्यांना आता स्वतःच्या घरातच मृत्यूची भीती सतावत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘एक सैनिक = 1 अब्ज डॉलर्स’, मोजतबा खामेनीचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई गर्जले; दिले थेट ट्रम्पना चॅलेंज

ISI आणि पाकिस्तानी लष्कराची धाकधूक

अमीर हमजावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ने हमजाला ठेवलेल्या रुग्णालयाची सुरक्षा कडक केली आहे. या ‘टार्गेट किलिंग’मागे कोणाचा हात आहे, याचा तपास पाकिस्तानी यंत्रणा करत आहेत. मात्र, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पाकिस्तान आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमीर हमजा कोण होता?

    Ans: अमीर हमजा हा लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा अत्यंत जवळचा सहकारी होता.

  • Que: अमीर हमजावर कुठे हल्ला झाला?

    Ans: पाकिस्तानच्या लाहोर शहरात एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी हमजावर गोळीबार केला.

  • Que: अमीर हमजा भारतासाठी का धोकादायक होता?

    Ans: हमजा भारताविरुद्धच्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये, विशेषतः काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये आणि दहशतवाद्यांच्या भरती प्रक्रियेत सक्रिय होता.

Web Title: Amir hamza lashkar e taiba killed lahore unknown gunmen hafiz saeed aide 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Lahore
  • Lashkar-e-Taiba terrorist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.