Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-pakistan war : ‘भारत आता शांत बसणार नाही’, राजनाथ सिंह यांच्या विधानाने सीमापार राजकारण तापले; पाकिस्तानकडूनही पलटवार

India-pakistan war : राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरोधात दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर, एका पाकिस्तानी लष्करी कमांडरने प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमागील संपूर्ण कहाणी आणि भारत व पाकिस्तानमधील वाढत्या शाब्दिक चकमकींविषयी जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 17, 2026 | 03:18 PM
India-pakistan war : ‘भारत आता शांत बसणार नाही’, राजनाथ सिंह यांच्या विधानाने सीमापार राजकारण तापले; पाकिस्तानकडूनही पलटवार
Follow Us
Follow Us:
  • भारताचा कडक इशारा
  • पाकिस्तानी लष्कराची प्रतिक्रिया
  • शाब्दिक युद्धाला उधाण

भारत आणि पाकिस्तान (India-pakistan war) यांच्यातील राजनैतिक आणि लष्करी तणाव पुन्हा एकदा नव्या वळणावर पोहोचला आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १५ ऑक्टोबर रोजी दहशतवादाविरोधात दिलेल्या अत्यंत कठोर इशाऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि जर पुन्हा असा प्रयत्न झाला, तर भारताचे प्रत्युत्तर हे भूतकाळातील कारवाईपेक्षा अधिक भयानक आणि तीव्र असेल, असा सज्जड दम राजनाथ सिंह यांनी दिला होता. या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी गोटात अस्वस्थता पसरली असून तिथल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिआव्हान देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

लष्करी कमांडरने काय दिला इशारा?

पाकिस्तानी वृत्तसंस्था ‘डॉन’ (Dawn) च्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या नॅशनल स्ट्रॅटेजिक कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल आमेर रझा यांनी शनिवारी पाकिस्तान मिलिटरी अकादमीतील पासिंग आऊट परेडदरम्यान राजनाथ सिंह यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले. आपल्या भाषणात त्यांनी भारताचे थेट नाव न घेता अण्वस्त्रांचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. “अण्वस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या दक्षिण आशियाई प्रदेशात युद्धाला अजिबात जागा नाही,” असे सांगत त्यांनी पाकिस्तानचे लष्कर सीमांच्या रक्षणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा केला. तसेच, शत्रूने कोणतीही चुकीची गणना किंवा धाडस केल्यास त्यांना कल्पनेपलीकडचे प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि बालाकोटचा संदर्भ: भारताची बदललेली आक्रमक रणनीती

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट हवाई हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा विशेष उल्लेख केला होता. या सर्व ऐतिहासिक लष्करी कारवायांनी भारताच्या सुरक्षेच्या आणि दहशतवादविरोधी धोरणातील आमूलाग्र बदल जगासमोर मांडला आहे. भारताला शेजारी देशांसोबत नेहमीच शांतता हवी आहे, परंतु या शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेला भारताची कमजोरी समजण्याची चूक कोणीही करू नये, असे राजनाथ सिंह यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत बजावले होते.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या ‘जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्करी कमांडरने आपल्या भाषणात भारत पाकिस्तानविरोधात ‘कथानकाचे युद्ध’ (Information Warfare) खेळत असल्याचा आरोप केला. शत्रू देश पाकिस्तानच्या जनतेमध्ये आणि तेथील सैन्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अप्रत्यक्ष कारवायांच्या (Proxy Wars) माध्यमातून पाकिस्तानला अंतर्गत स्तरावर अस्थिर करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचे हास्यास्पद आरोपही त्यांनी केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Yemen War: येमेनमध्ये युद्धाचा भडका! हुथींनी एडन विमानतळ अन् राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्रे डागली; 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी

पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचा आक्षेप अन् प्रत्यक्ष वस्तुस्थिती

पाकिस्तानी लष्करासोबतच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही (Foreign Office) राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर अधिकृतपणे तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य हे चिथावणीखोर आणि वर्चस्ववादी मानसिकतेचे लक्षण आहे, असा आरोप पाकिस्तानने केला. मात्र, पाकिस्तान कितीही आक्रमक भाषेचा वापर करत असला, तरी त्यांच्या लष्करी कमांडरच्या भाषणात भारताच्या इशाऱ्याला उत्तर म्हणून कोणत्याही प्रत्यक्ष लष्करी कारवाईची किंवा धोरणात्मक बदलाची घोषणा करण्यात आलेली नाही.

एकंदरीत पाहता, भारताच्या आक्रमक आणि स्पष्ट भूमिकेमुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅकफूटवर गेला आहे. सीमेवरील दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला आता भारताच्या नव्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची पूर्ण कल्पना आली आहे. त्यामुळेच केवळ शाब्दिक धमक्या आणि अण्वस्त्रांचा धाक दाखवून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला काय इशारा दिला?

    Ans: सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया झाल्यास भारत शांत बसणार नाही आणि पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला.

  • Que: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) काय आहे?

    Ans: 'ऑपरेशन सिंदूर' ही भारतीय सैन्याने सीमेपलीकडील दहशतवादी तळांवर केलेली एक अत्यंत अचूक आणि आक्रमक लष्करी कारवाई होती.

  • Que: राजनाथ सिंह यांच्या विधानावर पाकिस्तानची काय प्रतिक्रिया आली?

    Ans: भारताच्या इशाऱ्याने घाबरलेल्या पाकिस्तानने 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत भारतावर प्रादेशिक शांतता बिघडवल्याचा कांगावा केला आहे.

Web Title: Rajnath singh warning to pakistan army response operation sindoor hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • Rajnath Singh
  • World news

संबंधित बातम्या

Yemen War: येमेनमध्ये युद्धाचा भडका! हुथींनी एडन विमानतळ अन् राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्रे डागली; 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी
1

Yemen War: येमेनमध्ये युद्धाचा भडका! हुथींनी एडन विमानतळ अन् राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्रे डागली; 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा
2

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
3

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
4

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.