भारतातील उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवर कायम सक्रिय असतात. ते अनेकदा काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नेटकऱ्यांना दिलेलं एक वचन आज आनंद महिंद्रा यांनी पूर्ण केलं आहे. त्यामुळे आनंद महिंद्रा यांचं ट्विट (Anand Mahindra Tweet) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. (Viral Video)
Virtuoso violinist Joshua Bell… (4/5) pic.twitter.com/xCEsg8QDfK
— anand mahindra (@anandmahindra) June 23, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मोदींनी याआधी अनेकदा अमेरिकेचा दौरा केला असला तरी यावेळी मात्र एक वेगळी गोष्ट घडतेय. मोदींच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आज पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये (White House Video) भव्य स्टेट डिनरचे आयोजन केलंय. यावेळी अमेरिकेतल्या काही मान्यवरांसह भारतातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. यामध्ये महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे देखील या गाला डिनरला हजर होते. यावेळी आनंद महिंद्रांनी डिनरचे काही व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यासंदर्भातलं वचन आनंद मंहिद्रांनी नेटकऱ्यांना दिलं होतं.
ट्विटमध्ये, महिंद्रांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ वाजवणाऱ्या बँडचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. डिनरसाठी आलेल्यांना भारतीय गोष्टींचा अनुभव घेता यावा, यासाठी बँडने हे गाणं वाजवलं. तर दुसर्या ट्विटमध्ये, व्हायोलिन वादक जोशुआ बेल यांचा एक व्हिडिओ महिंद्राने शेअर केला आहे. त्याचा परफॉर्मन्स ऐकून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल. व्हाईट हाऊसमधील हे व्हिडिओ शेअर केल्याबद्दल अनेकांनी आनंद महिंद्राचे आभार मानले आहेत.