फोटो सौजन्य: Pinterest
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील मूळ ‘फ्ली’ मोटरसायकलपासून ‘फ्लाइंग फ्ली’चे डिझाइन प्रेरित आहे. या बाईकमध्ये गोल आकाराचा हेडलाईट, मोठे अलॉय व्हील्स आणि सडपातळ बॉडी डिझाइन देण्यात आले असून त्यामुळे तिला आकर्षक रेट्रो लूक मिळतो.
यात चेन ड्राइव्हऐवजी बेल्ट ड्राइव्ह प्रणाली वापरण्यात आली आहे, ज्यामुळे बाईक चालवताना अधिक शांत आणि स्मूथ अनुभव मिळतो. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील व मागील दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत.
दरारा असावा तर असा! 31 दिवसात तब्बल 2 लाखांहून अधिक घरात पोहोचली ‘ही’ स्कूटर, नंबर 1 हिसकवणे अशक्यच
ही बाईक यापूर्वी इटलीतील मिलान येथे झालेल्या EICMA 2024 मोटर शोमध्ये अनावरण करण्यात आली होती. आकर्षक डिझाइनमुळे Flying Flea C6 ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र, तिचा परफॉर्मन्सही तितकाच प्रभावी असेल का, याबाबत उत्सुकता आहे.
कंपनीने अद्याप या इलेक्ट्रिक बाईकचे अधिकृत तांत्रिक तपशील जाहीर केलेले नाहीत. मात्र, अंदाजानुसार ही बाईक 250-300cc आयसीई बाईकच्या तोडीचा परफॉर्मन्स देऊ शकते.
‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या
सस्पेन्शनसाठी गर्डर फोर्क आणि मोनोशॉक सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स देण्यात आले असून 19-इंच अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत. मागील चाक चेन ड्राइव्ह प्रणालीद्वारे चालवले जाते.
रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.5 लाख रुपये असण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. तसेच पुढील दोन ते तीन महिन्यात ही बाईक लाँच होण्याची अपेक्षा आहे.






