Argentina eases entry for Indian citizens with US visas
Argentine Visa News : भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिनामध्ये विना व्हिसा तुम्हाला जाता येणार आहे. पण यासाठी एक अट मान्य करावी लागाणार आहे. अर्जेंटिनाने भारतीयांना देश व्हिसा मुक्त प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. मात्र यासाठी भारतीयांकडे अमेरिकेचा पर्यटक व्हिसा असणे आवश्यक आहे. याची माहिती अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत मारियानो कौसिनो यांनी सोशल मीडियावरुन दिली.
त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, भारतीयांचे देशात स्वागत आहे. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही आमच्या देशात भारतीयांना आता विना व्हिसा प्रवेश मिळेल. पण यासाठी तुमच्या अमेरिकेचा वैध पर्यटक व्हिसा असणे गरजेचे आहे.
अर्जेंटिनाच्या सरकारने अमेरिकन व्हिसा असलेल्या भारतीयांसाठी प्रवेशच्या नियमांमध्ये काही बदलही केले आहे. यामुळे अर्जेंटिना व्हिसासाठी अर्ज न करता तुम्हाला देशात प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. तुमच्या अमेरिकन व्हिसा असल्यास तुम्ही अर्जेंटिनामध्ये विना व्हिसा प्रवास करु शकता.
भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून
ARGENTINA EASES ENTRY TO INDIAN CITIZENS HOLDING A US VISA
The Argentine Government has eased entry into the country for Indian citizens with US visas. The resolution published in the Official Gazette allows…
— Mariano Caucino (@CaucinoMariano) August 27, 2025