युक्रेनच्या राजधानीवर रशियाचा ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा; निवासी इमारतींना लक्ष्य, ३ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War : कीव/ मॉस्को : गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाने (Russia Ukraine War) संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. हे युद्ध दिवसेंदिवस घातल होत चालले आहे. रशियाने युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. नुकतेच रशियाने युक्रेनची राजधनी कीवर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. यामध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा वापर करण्यात आला आहे.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (२८ ऑगस्ट) पहाटे रशियाने कीववर तीव्र हल्ल केले आहे. शांतता चर्चांदरम्याने रशियाचे हे हल्ले संकेत देतात की त्यांना युद्ध सुरुच ठेवायचे आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी सतत हल्ले होत आहे. गुरुवारी झालेल्या हल्ल्यात किमान तीन जणांचा मृत्यू आणि १२ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. कीवच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीने मुलीचाही समावेळ आहे. रशियाने थेट लोकांच्या घरांवर हल्ले सुरु केले आहेत. कीवमध्ये सर्व काही उद्ध्वस्त झाल्यचे प्रशासनाने म्हटले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात २० हून अधिक क्षेत्रे प्रभावित झाली आहे. अनेक इमारती कोसळल्या असून लोक मलब्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. सध्या लोकांना बाहेर काढण्याचे काम बचाव बथकाने सुरु केले आहे. शिवाय रशियाने युक्रेनच्या डोनेट्स्क प्रांतातील निप्रोपेट्रोव्हस्क प्रदेशावरही ताबा मिळवला आहे. युक्रेन औद्यागोकि भाग रशियाच्या ताब्यात आहे. सध्या युद्ध भयंकर होत आहे.
Authorities say a mass Russian drone and missile attack on Ukraine’s capital killed at least three people and injured 12. https://t.co/9jm8uk5NMg
— The Associated Press (@AP) August 28, 2025
दरम्यान युक्रेनमधील युद्धसंपवण्यासाठी सध्या चर्चा सुरु आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाचे अध्यत्र व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांची भेट घेतली होती. अलास्कामध्ये ही बैठक पार पडली. मात्र यामध्ये कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
पण या बैठकीनंतर ट्रम्प यांनी युक्रेन अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) आणि युरोपीय देशांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीसाठी शांतता चर्चेवर सहमती झाली होती. रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि झेलेन्स्की यांची देखील भेट होणाार असे ट्रम्प यांनी सांगितले होते. पण या बैठीपूर्वीचे रशियाने पुन्हा युक्रेनवर हल्ले सुरु केले. तसेच युक्रेनने देखील रशियावर हल्ले केले आहेत.