
Asim Munir gains permanent power after the 27th Amendment army unrest fuels mutiny speculation
Pakistani 27th Amendment : पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणात आणि सत्तेत ऐतिहासिक बदल घडवणारी २७ वी घटनादुरुस्ती मंजूर झाल्यानंतर देशात तीव्र राजकीय आणि लष्करी खळबळ उडाली आहे. या दुरुस्तीमुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर(Asim Munir) हे आता देशातील सर्वात प्रभावी व्यक्ती बनले आहेत. या सुधारनेनुसार, जोपर्यंत मुनीर जिवंत आहेत तोपर्यंत कोणताही अन्य अधिकारी लष्करप्रमुख होऊ शकत नाही, तसेच पुढील लष्करप्रमुखाची नियुक्ती करण्याचा हक्कही त्यांच्याकडेच असेल. या निर्णयामुळे पाकिस्तानात लोकशाही व्यवस्थेचा पाया हादरला असल्याची भावना बौद्धिक समाज, कायदेपंडित आणि नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
या वादग्रस्त दुरुस्तीमुळे पाकिस्तानच्या संविधानातील कलम २४३ मध्येही बदल करण्यात आला आहे. आता असीम मुनीर यांना Chief of Defence Forces (CDF) पदानुसार थलसेना, नौदल आणि हवाई दलावर पूर्ण नियंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय, सैन्याच्या पंचतारांकित अधिकाऱ्यांना आजीवन कायदेशीर संरक्षण, म्हणजेच त्यांच्यावर कोणत्याही निर्णयाबाबत खटला चालवता येणार नाही, अशी प्रतिकारशक्ती मिळाली आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकीय संरचनेवर हुकूमशाहीची सावली आणखी गडद झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Defense : पाकिस्तानने आता युद्धासाठी तयार राहावे, भारताचा धोरणात्मक संयम संपला; ‘Two-Front war’ साठी इंडियन आर्मी सज्ज
या बदलामुळे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची कारकीर्द संपुष्टात येणार आहे. येत्या २७ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणारे जनरल साहिर शमशाद मिर्झा, जे एकेकाळी लष्करप्रमुखपदासाठी मोठे दावेदार होते, यांच्यानंतर CJCSC नावाचे राष्ट्रीय संरक्षण प्रमुख पद कायमच रद्द होणार आहे. इस्लामाबादमध्ये पसरलेल्या अहवालांनुसार, अनेक वरिष्ठ जनरलमध्ये असंतोष, सत्तासंघर्ष आणि संभाव्य बंडाची चर्चा सुरू आहे.
🇵🇰 NEW: Pakistan’s parliament has passed the 27th Amendment, enshrining permanent military supremacy over state institutions. The reform cements Field Marshal Syed Asim Munir’s control over all armed forces, grants him lifelong legal immunity, and subordinates the judiciary to… pic.twitter.com/brXP8xLWo1 — Drop Site (@DropSiteNews) November 12, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Germany News : ‘जर्मनीत मास्टर्स करूनही….’; भारतीय विद्यार्थ्याचा चिंताजनक दावा सोशल मीडियावर चर्चेत
भारताने यापूर्वी झिया-उल-हक ते परवेझ मुशर्रफपर्यंतच्या लष्करी सत्तांशी डिप्लोमसी आणि युद्ध दोन्ही अनुभवले आहेत. मात्र असीम मुनीर हे कट्टर इस्लामी विचारसरणीचे अधिकारी असून, अलीकडच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी भारताला अणुयुद्धाची खुलेआम धमकी दिली आहे. विशेषज्ञांचा इशारा आहे की पाकिस्तानमध्ये लोकशाही निष्प्रभ आणि लष्कर हाताबाहेर जात असल्याने भारत-पाक तणाव धोकादायक पातळीवर जाऊ शकतो. पाकिस्तान सध्या आजीवन लष्करी सत्ताकडे झुकत आहे, जिथे लोकशाहीपेक्षा बंदुकीचे राजकारण वरचढ ठरत आहे. देशात राजकीय अस्थिरता, सैन्यातील नाराजी आणि भारताशी संभाव्य संघर्ष या सर्व घटनांनी दक्षिण आशियातील तणाव वाढण्याची भीती वाढली आहे.
Ans: ही दुरुस्ती असीम मुनीर यांना पाकिस्तानच्या सैन्यावर आजीवन नियंत्रण देते.
Ans: होय, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
Ans: भारत-पाक तणाव वाढू शकतो आणि सुरक्षा तयारी वाढवावी लागेल.