
China Building Fire
China Condom Tax : लोकसंख्या वाढवण्यासाठी चीनचा नवा प्रयोग; थेट कंडोमवर लावला कर
सध्या ग्वांगडोंग प्रांतात लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन अधिकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग १५० चौरस मीटर परिसरात पसरली आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचताच आग नियंत्रणात आणली. परंतु या आगीत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या या आगीचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात हॉंगकॉंगमध्ये अनेक उंच इमारतींना आग लागली होती. या आगीत १६० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. यापर्वी देखील चीनमध्ये अशा आगीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे सातत्याने होणाऱ्या घटनांवर चीनच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आगीची घटना असो वा अपघात, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची योग्य काळजी घेतली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
यापूर्वी 9 एप्रिल रोजी उत्तर चीनमधील हेबेई प्रांतातील लोंगहुआ काऊंटीमधील एका नर्सिंग होममध्ये आग लागील होती. या आगीत 20 वृद्धांचा मृत्यू झाला होता. आगी लागली त्यावेळी नर्सिंग होममध्ये एकूण 39 वृद्ध उपस्थित होते. यापूर्वी 2025 च्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात देखील अशीच एक घटना घडली होती. चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजियाकौ शहरातील एका बाजारपेठेत लागलेल्या भीषण आग लागली होती. यामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
The death toll from the #fire in a residential building in #Shantou, #Guangdong province, on Tuesday night has risen to 12, reported Xinhua News Agency. https://t.co/T5ZVtDVq9N pic.twitter.com/6BD2VjHpVs — China Daily (@ChinaDaily) December 10, 2025
Ans: चीनच्या चायना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (१० डिसेंबर) ग्वांगडोंग प्रांतातील शांतौ भागात एका चार मजली इमारतीला आग लागली आहे.
Ans: चीनमध्ये रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.