हाँगकाँगमध्ये रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीमुळे भीषण परिस्थिती; आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळ गोळीबार; दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…
मिळालेल्या माहितीनुसार, हॉंगकॉंगच्या ताई पो परिसरातील वांग कुफ कोर्ट रहिवाशी इमारतीमध्ये दुपारी ३ वाजता ही घटना घडवी आहे. या इमारतींमध्ये सुमारे ४००० लोक राहतात. एका ३२ मजली इमारतील लागलेली आगे आसपासच्या इमारतींमध्ये पसरली आहे. आग इतकी भीषण होती की, संपूर्ण परिसक काही क्षणांतच धुराने आणि आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला आहे.
सध्या या आगीत शेकडो लोक अडकले असून त्यांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. आगची माहिती मिळताच अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. १२८ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ५७ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहे. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
आग भीषण असल्याने मदत कर्मचाऱ्यांना उंचावरील मजल्यावर पोहोचण्यात अडथळा येत आहे. शिवाय तपामान देखील प्रचंड उष्ण असल्याने अडथळे निर्माण होत आहेत. लोकांना आगीतूनवाचवताना काही अग्निशम दलाचे अधिकारी देखील जखमी झाले आहेत. तसेच एका ३७ वर्षी अधिकाऱ्याचा मृत्यू देखील झाला आहे.
President Xi Jinping expressed condolences on Wednesday for the victims of a major fire at a residential area in the Tai Po area of the Hong Kong Special Administrative Region and for the firefighter who died in the line of duty. #XiJinping #习近平 @XisMoments… pic.twitter.com/2kVdoHsZb2 — China Daily (@ChinaDaily) November 26, 2025
हॉंगकॉंग हा चीनचा प्रदेश आहे. चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (XI Jinping) यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी पीडीतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती दर्शवली आहे. हॉंगकाँग प्रशासनाला लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या या आगीचे कारण अस्पष्ट आहे. घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रथामिक तपासानुसार, इमारतीतील बांबूच्या मचानांना आग लागल्याने ही दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना हॉंगकॉंगमधी सर्वात मोठी आणि गंभीर दुर्घटना मानली जात आहे.
Ans: हॉंगकॉंगमध्ये बुधवारी (२६ नोव्हेंबर) ताई पो भागात एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली होती. एका वांग फुक कोर्ट गुहनिर्माण इमारती बाहेर अनेक टॉवर्समध्ये ही आग पसरली आहे.
Ans: हॉंगकॉंगधील आग दुर्घटनेत ४४ जणांचा मृत्यू आणि २०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.
Ans: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी पीडीतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती दर्शवली आहे.






