China Condom Tax : चीनचा लोकसंख्या वाढीसाठी अजब निर्णय; थेट कंडोमवर लावला कर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
China Crypto Ban: क्रिप्टो Trading ला चीनचा रेड अलर्ट! आर्थिक स्थिरतेसाठी कडक कारवाईची तयारी
चीनने (China) आता जन्मदर वाढवण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. चीनने थेट कंडोम आणि गर्भनिरोधक उत्पादनांवर १३% कर लागू केला आहे. जन्मदर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये बालसंगोपणासाठीच्या सेवांमधून लोकांना सुट देण्यात आली आहे. पण यामुळे देशभरात आरोग्य समस्यांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षात चीनच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. २०२४ मध्ये चीनचा जन्मदर हा ९५.४ दशलक्ष होता.
चीनच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हा कर लागू करण्यात आला असून जानेवारी २०२६ पासून हा निर्णय लागू होणार आहे. १९९० मध्ये चीनने गर्भनिरोधक वस्तूंना VAT मधून जास्त लोकंसख्या वाढीमुळे सूट दिली होती. सराकरेन लोकांना गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास, कंडोम व्यापक व्यापाराला प्रोत्साहन दिले होते. तसेच लोकसंख्या कमी करण्यासाठी गर्भपात आणि नसबंदी देखील केली जात होती. आता मात्र चीनने आपल्या धोरणांमध्ये पूर्णपणे बदल केला आहे.
सध्या चीन लोकांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. यासाठी बालसंगोपन किंवा कौटुंबिक जीवनासाठी आवश्यक असलेल्या सेवा स्वस्त केल्या जात आहे. तसेच काही योजना देखील आखल्या जात आहेत. ज्या अंतर्गत बालसंगोपनासाठी लोकांना सरकारकडून सुविधा मिळणार आहे. याशिवाय पालकांना त्यांच्या शिक्षणासाठी देखील अनुदान दिले जाणार आहे. असे वेगवेगळे प्रयोग चीनने गेल्या काही काळात राबवत आहेत. चीनमध्ये गेल्या काही काळात चीनचा जन्मदर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. लोकसंख्या घटू लागल्याने त्याचे दुष्परिणाम चीनच्या लक्षात आले आहे. यामुळे चीनने आपल्या जन्मदर योजेनांमध्ये मोठा बदल केला आहे.






