At least 40 killed in Nepal due to landslides and flood
Nepal Heavy Rain Update : काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) गेल्या ३६ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसधार पावसाने नेपाळच्या अनेक भागांमध्ये कहर केला आहे. पावासामुळे पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक भागात रस्त आणि पूल वाहून गेले आहे. सर्व काही ठप्प झाले आहेत. रॉयटर्सने दिलेल्या अहवालानुसार, मुसधार पावसामुळे ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक बेपत्ता झाले आहेत.
सध्या आपत्कालीन सेवांना मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. नेपाळचे पोलिस प्रवक्ते विनोद घिमिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक लोकांचा भूस्खलानात मृत्यू झाला आहे. तसेच दक्षिण नेपाळमध्ये तीन लोकांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तर नेपाळच्या उदयपूर जिल्ह्यातही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुरात बुडून ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक पूराच्या पाण्यात वाहून गेले असू त्यांचा शोध घेणे सुरु आहे. पण खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळा येते आहे.
भूस्खलनामुळे अनेक महामार्ग बंद
नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागात पावसामुळे भूस्खलन झाले आहे. यामुळे अनेक महामार्गही बंद झाले आहे. अनेक पूल वाहून गेले आहेत. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे शेकडो प्रवासी अडकले आहेत. सध्या या प्रवाशांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे. याशिवाय देशांतर्गत विमान उड्डाणांवरही मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरळित सुरु आहेत.
कोसी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ
याच वेळी आग्नेय नेपाळमधील कोसी नदीच्या पाण्याच्या पातळीबत प्रचंड वाढ होत आहे. या नदीमुळेच दरवर्षी बिहार राज्यात पूर येतो. यामुळे नदीच्या सखल भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांमा उंच ठिकाणी स्थलांतर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वर्षी नेपाळमध्ये मान्सून हंगामामुळे १०० हून अधिक लोक मरण पावले आहेत, तर डझनभर लोक बेपत्ता झाले आहेत.
प्रश्न १. नेपाळमध्ये सध्या पावसाची काय परिस्थिती आहे?
नेपाळमध्ये गेल्या ३६ तासापासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागात पूराची आणि भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली आहे.
प्रश्न २. नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे किती जीवितहानी झाली?
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनात ४७ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत.
नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी