Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Australia च्या विमानात ढेकणांचा सुळसुळाट! क्वांटसची रोम-पर्थ फ्लाइट रद्द, प्रवाशांची गैरसोय

Australia : ऑस्ट्रेलियातील एका विमान कंपनीच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना ढेकूण चावल्याचा प्रकार घडला. प्रवाशांनी याबाबत तक्रार केली असता विमान कंपन्यांनी तातडीने त्या विमानाची सखोल स्वच्छता करण्यात आली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 13, 2026 | 05:10 PM
Australia च्या विमानात ढेकणांचा सुळसुळाट! क्वांटसची रोम-पर्थ फ्लाइट रद्द, प्रवाशांची गैरसोय

Australia च्या विमानात ढेकणांचा सुळसुळाट! क्वांटसची रोम-पर्थ फ्लाइट रद्द, प्रवाशांची गैरसोय

Follow Us
Follow Us:
  • विमानाची सखोल स्वच्छता
  • प्रवाशांच्या सामानातून ढेकूण आल्याचा संशय
  • ढेकणांचा नायनाट करणे कठीण
विमानाच्या सीटमध्ये चक्क ढेकूण आढळल्याने ऑस्ट्रेलियाच्या (Australia) क्वांटस विमान कंपनीला मोठा निर्णय घ्यावा लागला. रोम येथे कंपनीचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान तात्पुरते सेवेतून हटवून त्याची सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. या प्रकारामुळे रोम ते पर्थ हे परतीचे उड्डाण रद्द करावे लागले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना पर्यायी विमानांमधून प्रवासाची व्यवस्था करण्यात आली.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, 9 ऑक्टोबर रोजी पर्थहून रोमला जाणाऱ्या क्वांटसच्या QF5 या विमानातील इकॉनॉमी क्लासच्या पुढील भागातील काही सीटमध्ये ढेकूण आढळले. या कीटकांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विमान रोम येथे पोहोचल्यानंतर स्वच्छतेसाठी ते सेवेतून तात्पुरते हटवण्यात आले. त्यामुळे 10 ऑक्टोबर रोजी रोम ते पर्थ हे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले.

विमानाची सखोल स्वच्छता

क्वांटसने या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. इकॉनॉमी क्लासमधील काही सीटमध्ये ढेकूण आढळल्यानंतर अभियंते आणि देखरेख पथकाने विमानाची संपूर्ण स्वच्छता केल्याचे कंपनीने सांगितले. उड्डाण रद्द झाल्यामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली.

प्रभावित प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. तसेच, त्यांच्या नियोजित उड्डाणाच्या वेळेपासून 48 तासांच्या आत पर्यायी विमानांमध्ये त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

क्वांटसच्या म्हणण्यानुसार, विमानांच्या आतील भागाची नियमित स्वच्छता केली जाते. स्वच्छतेचे उच्च निकष राखण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. खबरदारीचा उपाय म्हणून दर ५० दिवसांनी विमानांमध्ये कीटकनाशकाचाही वापर केला जातो.

Fatal Roller Coaster Accident: थरारक राईड ठरली जीवघेणी! अमेरिकेतील थीम पार्कमध्ये Roller Coasterवरून पडून एकाचा मृत्यू

प्रवाशांच्या सामानातून ढेकूण आल्याचा संशय

हे ढेकूण एखाद्या प्रवाशाच्या कपड्यांमधून किंवा सामानातून विमानात पोहोचले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे कीटक अंधाऱ्या जागांमध्ये लपून राहतात. कपडे, बॅगा, फर्निचर आणि सीटच्या फटींमध्ये ते सहज लपून राहू शकतात. हॉटेल किंवा अन्य प्रवासाच्या ठिकाणांहूनही त्यांचा प्रसार होऊ शकतो.

2026 Nobel Prize in Economics: अर्थशास्त्रातील नोबेलवर अमेरिकेची मोहोर! ‘या’ दोन दिग्गज अर्थतज्ज्ञांच्या नावांची घोषणा

ढेकणांचा नायनाट करणे कठीण

ढेकूण हे लहान आकाराचे, पंख नसलेले परजीवी कीटक आहेत. ते माणसांसह काही सस्तन प्राण्यांचे रक्त शोषतात. त्यांच्या चाव्यामुळे त्वचेवर खाज आणि जळजळ होऊ शकते. मात्र, सामान्यतः त्यांच्या चाव्यामुळे गंभीर आरोग्यसमस्या निर्माण होत नाहीत.

हे कीटक सीटच्या फटी, गाद्या, कपडे आणि बिछान्यांमध्ये लपून राहू शकतात. अन्नाशिवायही ते दीर्घकाळ जिवंत राहू शकतात. त्यामुळे त्यांचा पूर्णपणे नायनाट करणे कठीण ठरते.

ढेकणांची समस्या कोणत्याही एका आर्थिक वर्गापुरती मर्यादित नाही. वारंवार प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सामानातून ते नकळत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतात. त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य स्वच्छता आणि प्रभावी कीटकनियंत्रण आवश्यक असते.

Web Title: Australia qantas flight bedbugs boeing 787 rome perth flight cancelled rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Airline
  • Australia
  • flight

संबंधित बातम्या

आता हवं तसं जेवण मिळणार थेट आकाशात! Akasa Air च्या नव्या In-Flight Menu ने जिंकलं प्रवाशांचे मन; पाहा काय आहेत खास मेन्यू
1

आता हवं तसं जेवण मिळणार थेट आकाशात! Akasa Air च्या नव्या In-Flight Menu ने जिंकलं प्रवाशांचे मन; पाहा काय आहेत खास मेन्यू

October Heat : ऑस्ट्रेलियात पुन्हा ‘वणवा’ पेटणार? वाढते तापमान पाहता प्रशासन हाय अलर्टवर
2

October Heat : ऑस्ट्रेलियात पुन्हा ‘वणवा’ पेटणार? वाढते तापमान पाहता प्रशासन हाय अलर्टवर

भारत-सिंगापूर प्रवाशांसाठी खूशखबर! Air India अन् Singapore Airlines ची मोठी भागीदारी; 126 विमानांच्या फेऱ्यांचे अधिक पर्याय
3

भारत-सिंगापूर प्रवाशांसाठी खूशखबर! Air India अन् Singapore Airlines ची मोठी भागीदारी; 126 विमानांच्या फेऱ्यांचे अधिक पर्याय

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
4

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.