Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sergio Gor: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी ट्रम्पच्या खास दूताला डावलले; ‘या’ कृत्याने अमेरिकेचा अपमान केल्याचा तज्ज्ञांचा आरोप

Sergio Gor : तज्ज्ञांनी बालेन शाह यांच्या 'अनावश्यक बढाई'वर आणि नेपाळमधील सर्जिओ गोर यांच्या 'अपमानावर' जोरदार टीका केली असून, याला नेपाळी पंतप्रधानांचे एक चुकीचे पाऊल म्हटले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 03, 2026 | 11:40 AM
balen shah rejects sergio gor meeting nepal us tension 2026

balen shah rejects sergio gor meeting nepal us tension 2026

Follow Us
Follow Us:
  • बालेन शाह यांचा भेटीला नकार
  • तज्ज्ञांकडून तीव्र टीका
  • राजनैतिक प्रोटोकॉलचा पेच

Balen Shah vs Sergio Gor Nepal : नेपाळच्या (nepal) राजकारणात सध्या एका नव्या वादाने तोंड वर काढले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आणि मध्य आशियासाठीचे अत्यंत विश्वासू आणि विशेष दूत सर्जिओ गोर यांनी नुकताच आपला नेपाळ दौरा आटोपला. मात्र, या दौऱ्यात त्यांनी नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह (बालेन शाह) यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पंतप्रधानांच्या या अनपेक्षित नकाराने नेपाळच्या परराष्ट्र धोरणाबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमका वाद काय आहे?

सर्जिओ गोर हे केवळ एक अधिकारी नसून ते डोनाल्ड ट्रम्प यांचे खास दूत आहेत. अमेरिकेकडून वारंवार विनंती करूनही पंतप्रधान कार्यालयाने ही भेट नाकारली. यामागचे कारण देताना बालेन शाह यांच्या कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधान सध्या देशांतर्गत प्रश्न आणि प्रशासकीय कामात व्यस्त आहेत. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार बालेन शाह यांनी एक विशिष्ट धोरण अवलंबले आहे, ज्यानुसार ते केवळ स्वतःच्या पदाच्या बरोबरीच्या नेत्यांनाच भेटतात. परराष्ट्र मंत्री किंवा त्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांना भेटणे त्यांनी टाळले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Lebanon War: युद्धविराम की फसवणूक? लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे प्रचंड विध्वंस; घटनेचा VIDEO VIRAL

तज्ज्ञांचा संताप: ‘ही तर अनावश्यक बढाई’

नेपाळचे प्रसिद्ध परराष्ट्र धोरण अभ्यासक कनक मणी दीक्षित यांनी या घटनेवर अत्यंत जहाल भाषेत टीका केली आहे. ते म्हणाले की, “सर्जिओ गोर हे भारतासाठी अमेरिकेचे राजदूत असण्यासोबतच ट्रम्प यांचे विशेष दूत आहेत. त्यांना भेटायला नकार देणे ही केवळ औद्धत्य आणि अनावश्यक बढाई आहे.” तज्ज्ञांच्या मते, नेपाळसारख्या देशाला अमेरिकेसारख्या महासत्तेसोबत संबंध बिघडवणे परवडणारे नाही. या निर्णयामुळे नेपाळच्या हिताचे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

After Muizzu, Nepal PM Balen Shah held no meeting with Sergio Gor, Trump’s South & Central Asian envoy. https://t.co/PXcnoAKVm1 — Sidhant Sibal (@sidhant) May 3, 2026

credit – social media and Twitter

अमेरिकन दूतावासाची मवाळ पण स्पष्ट भूमिका

दुसरीकडे, अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सर्जिओ गोर यांनी नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशेर खनाल आणि अर्थमंत्री वागळे यांच्याशी यशस्वी चर्चा केली. या चर्चेचा मुख्य हेतू नेपाळमध्ये अमेरिकन गुंतवणूक वाढवणे आणि व्यापारी संबंध दृढ करणे हा होता. पंतप्रधान शाह यांच्याशी भेट झाली नसली तरी, इतर मंत्र्यांसोबतच्या बैठका सकारात्मक होत्या, असे दूतावासाने म्हटले आहे. मात्र, राजनैतिक वर्तुळात याकडे ‘दुसऱ्या फळीतील नेत्यांशी संवाद’ म्हणून पाहिले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lipulekh Pass: कैलाश मानसरोवर यात्रेमुळे पुन्हा पेटला लिपुलेख वाद; भारताच्या ‘या’ घोषणेनंतर नेपाळ संतापला, जाणून घ्या भू-राजकारण

बालेन शाह यांचा कडक पवित्रा

बालेन शाह यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान सध्या कोणत्याही परदेशी दौऱ्यावर जाणार नाहीत आणि परदेशी नेत्यांच्या भेटीबाबत ते अत्यंत चोखंदळ आहेत. किमान वर्षभर त्यांनी परदेश दौऱ्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागतिक राजकारणात अशा प्रकारची ‘आयसोलेशन’ची भूमिका नेपाळला जागतिक प्रवाहापासून दूर नेऊ शकते, असे मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सर्जिओ गोर कोण आहेत?

    Ans: सर्जिओ गोर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आणि मध्य आशियासाठीचे विशेष दूत आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत आहेत.

  • Que: बालेन शाह यांनी त्यांना भेटण्यास का नकार दिला?

    Ans: बालेन शाह यांच्या धोरणानुसार ते परराष्ट्र मंत्री किंवा त्यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटणे टाळतात, केवळ देशांतर्गत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

  • Que: तज्ज्ञांनी याला 'चुकीचे पाऊल' का म्हटले आहे?

    Ans: कारण अमेरिका ही जगातील महासत्ता आहे आणि त्यांच्या विशेष दूताला भेट नाकारल्याने नेपाळच्या परराष्ट्र संबंधांवर आणि परदेशी गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Web Title: Balen shah rejects sergio gor meeting nepal us tension 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • America
  • Balen Shah
  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.