Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Balochistan Blackout : बलुचिस्तानमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा इंटरनेट बंद; काहीतरी मोठी योजना आखत आहे मुनीर सेना?

Pakistan News : अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने पाकिस्तान सरकारकडून बलुचिस्तानमध्ये वारंवार इंटरनेट बंद केल्याचा निषेध केला आहे आणि त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन म्हटले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 07, 2025 | 08:46 PM
balochistan third time internet pause munir sena big plan

balochistan third time internet pause munir sena big plan

Follow Us
Close
Follow Us:

Third Internet Pause Balochistan :  पाकिस्तानमधील अस्थिरता आणि असुरक्षिततेचे प्रतीक ठरलेला हा प्रदेश पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. पाकिस्तान सरकारने यामागे कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे केले असले तरी प्रत्यक्षात ही कारवाई स्थानिक लोकांना गप्प करण्याचा आणि बाहेरील जगापासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मानवी हक्क संघटनांकडून होत आहे.

इंटरनेट बंदीचे कारण की सबब?

५ सप्टेंबरच्या संध्याकाळी ते ६ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत बलुचिस्तानमध्ये ३जी आणि ४जी मोबाईल इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या. सरकारने धार्मिक मिरवणुका आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याचा धोका असल्याचे कारण दिले. परंतु स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ही बंदी सुरक्षेच्या नावाखाली माहिती दडपण्याचा डाव आहे. बलुचिस्तानमधील एका कार्यकर्त्याचे म्हणणे आहे की, “इंटरनेट हा आमचा मूलभूत मानवी हक्क आहे. पण सरकार आम्हाला जगापासून वेगळे ठेवण्यासाठी त्याचा वापर करत आहे. आम्हाला बाहेर काय घडते ते कळू नये, तसेच जगालाही इथल्या वास्तवाची माहिती मिळू नये, म्हणून अशा बंदी लादल्या जातात.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आमच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावे अशी आमची इच्छा आहे’, पुतिनच्या मंत्र्यांनी भारताचा उल्लेख करून असे ‘का’ म्हटले?

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा निषेध

या बंदीचा निषेध करताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार, हालचालीचे स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण मेळाव्याचा हक्क या सर्वांचा भंग करणारी असल्याचे म्हटले. संघटनेचे म्हणणे आहे की अशा पद्धतीने नागरिकांवर निर्बंध लादणे हे मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. अ‍ॅम्नेस्टीने यापूर्वीही पाकिस्तान सरकारच्या या पद्धतीवर टीका केली आहे. बलुचिस्तानमध्ये वेळोवेळी इंटरनेट सेवा बंद केल्या जातात आणि प्रत्येक वेळी सरकारकडून तोच दावा केला जातो “सुरक्षेच्या कारणास्तव.”

शिक्षण, रोजगारावर गंभीर परिणाम

बलुचिस्तानसारख्या मागासलेल्या प्रदेशात इंटरनेट हे केवळ सोशल मीडियाचे साधन नसून शिक्षण, रोजगार आणि माहिती मिळवण्याचा एकमेव स्रोत आहे. जेव्हा सेवा बंद होतात तेव्हा हजारो विद्यार्थी ऑनलाइन वर्गांना मुकतात, तर नोकरीसाठी अर्ज करणारे तरुण वंचित राहतात.

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या युसरा सांगतात “हे बंद इतके सामान्य झाले आहेत की लोक आता त्यांना ‘नेहमीसारखे’ मानू लागले आहेत. एखाद्या गावात एखादा कार्यक्रम झाला की लगेच इंटरनेट बंद केले जाते. आम्हाला सांगतात की ते सुरक्षेसाठी आहे, पण कोणाच्या सुरक्षेसाठी? आम्हाला आपल्या कुटुंबीयांशी बोलता येत नाही, योग्य माहिती मिळत नाही. मग हा सुरक्षा देण्याचा दावा कोणासाठी आहे?”

माहिती लपवण्याचा खेळ?

बलुचिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांत पाकिस्तान सैन्याच्या कारवायांवर गंभीर आरोप झाले आहेत. निष्पाप नागरिकांवर अन्याय, जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि दहशतवादाच्या नावाखाली अत्याचार केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत इंटरनेट बंद केल्याने स्थानिकांचा आवाज बाहेर पोहोचत नाही. त्यामुळे हे सर्व जाणूनबुजून केले जाते का, असा प्रश्न आता अधिक तीव्रपणे विचारला जातो आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनी भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद क्षण; ‘INS Kadmatt’ ने केले फ्लीट रिव्ह्यूचे नेतृत्व

मानवी हक्कांचा गभीर मुद्दा

बलुचिस्तानमधील इंटरनेट बंदी हा फक्त तांत्रिक प्रश्न नाही, तर मानवी हक्कांचा गभीर मुद्दा आहे. एका महिन्यात तिसऱ्यांदा झालेली ही कारवाई केवळ लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत नाही, तर लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांनाही गळा घालते. पाकिस्तान सरकारने “सुरक्षा” या शब्दामागे दडपशाहीचे खरे रूप झाकण्याचा प्रयत्न केला, तरी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रदेशातील लोकांचा आवाज अधिक जोरात पोहोचत आहे.

Web Title: Balochistan third time internet pause munir sena big plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • Asim Munir
  • International Political news
  • pakistan
  • pakistan army

संबंधित बातम्या

Japan News: जपानमध्ये नेतृत्व संकट! पंतप्रधान शिगेरू इशिबा यांचा पंतप्रधान पदावरून राजीनामा; व्यापारी संबाधांवर होणार परिणाम?
1

Japan News: जपानमध्ये नेतृत्व संकट! पंतप्रधान शिगेरू इशिबा यांचा पंतप्रधान पदावरून राजीनामा; व्यापारी संबाधांवर होणार परिणाम?

Free DC protest : ‘अमेरिकन अत्याचार सहन करणार नाही…’, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशात घेरले; अमेरिकेत गदारोळ
2

Free DC protest : ‘अमेरिकन अत्याचार सहन करणार नाही…’, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशात घेरले; अमेरिकेत गदारोळ

Robinson R66 Crash : अमेरिकेत हेलिकॉप्टर कोसळले; मिनियापोलिस विमानतळाजवळ भीषण दुर्घटना, सर्व प्रवाशांचा मृत्यू
3

Robinson R66 Crash : अमेरिकेत हेलिकॉप्टर कोसळले; मिनियापोलिस विमानतळाजवळ भीषण दुर्घटना, सर्व प्रवाशांचा मृत्यू

Noor Khan Airbase: भारताने उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानी एअरबेसवरच उतरली अमेरिकन विमाने; नेमकं कारण काय?
4

Noor Khan Airbase: भारताने उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानी एअरबेसवरच उतरली अमेरिकन विमाने; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.