Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-EU FTA: भारताच्या एका सहीने होणार पाकिस्तान कंगाल? 1 कोटी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात; ‘या’ महाकरारामुळे इस्लामाबादमध्ये खळबळ

India EUFTAL: पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री गौहर एजाज यांनी त्यांच्या सरकारला इशारा दिला आहे की भारत-ईयू एफटीएमुळे पाकिस्तानमधील 1 कोटींहून अधिक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 30, 2026 | 02:15 PM
india eu fta deal pakistan economic collapse unemployment news 2026

india eu fta deal pakistan economic collapse unemployment news 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचा मास्टरस्ट्रोक
  • पाकिस्तानला मोठा हादरा
  • आर्थिक नाकेबंदी

Pakistan economy collapse India EU deal :  जागतिक व्यापाराच्या नकाशावर भारताने एक अशी खेळी खेळली आहे, ज्याचे पडसाद शेजारील देश पाकिस्तानात उमटू लागले आहेत. २७ जानेवारी रोजी नवी दिल्लीत भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात झालेल्या ‘मुक्त व्यापार करारावर’ (FTA) स्वाक्षरी झाल्यानंतर पाकिस्तानच्या गोटात दहशतीचे वातावरण आहे. पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री आणि दिग्गज उद्योगपती गौहर एजाज यांनी आपल्या सरकारला अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, या करारामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊ शकते.

१ कोटी नोकऱ्या आणि ९ अब्ज डॉलर्सचे नुकसान!

गौहर एजाज यांनी ‘एआरवाय न्यूज’शी बोलताना धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले, “भारत आणि युरोपमधील हा करार ‘सर्व करारांची जननी’ (Mother of all deals) आहे. यामुळे पाकिस्तानच्या कापड (Textile) उद्योगाला ९ अब्ज डॉलर्सचा फटका बसेल. परिणामी, कापड उद्योगाशी संबंधित १ कोटीहून अधिक लोकांचा रोजगार एका झटक्यात जाऊ शकतो.” पाकिस्तानसाठी युरोप ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे, पण आता तिथे भारताचे वर्चस्व निर्माण होणार असल्याने पाकिस्तानी मालाला कुणीही विचारणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक

भारताला मिळणार ‘झिरो-टॅक्स’चा फायदा

आतापर्यंत पाकिस्तानला युरोपात व्यापार करण्यासाठी काही विशेष सवलती (GSP+) मिळत होत्या. मात्र, भारत-ईयू करारामुळे भारताला आता युरोपीय बाजारपेठेत ‘शून्य-कर’ (Zero-Tax) सुविधेसह प्रवेश मिळणार आहे. भारतीय मालाचा दर्जा आणि स्पर्धात्मक किंमत यामुळे पाकिस्तानी उद्योगांना बाजारपेठेत टिकणे अशक्य होईल. एजाज यांनी शाहबाज शरीफ सरकारला खडसावले आहे की, जर देशांतर्गत उद्योगांना स्वस्त वीज आणि गॅस दिला नाही, तर पाकिस्तानचा उद्योग शेजारील देशांच्या (भारत) बरोबरीने कधीच टिकू शकणार नाही.

Pakistan’s former commerce minister Gohar Ejaz says India, EU FTA has put “employment of over 10 million people in Pakistan at risk”, even as the Pakistani foreign ministry said they are ‘aware’ of the FTA: pic.twitter.com/cbbSKhKzUx — Sidhant Sibal (@sidhant) January 30, 2026

credit – social media and Twitter

२० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताची ‘ग्रँड डील’

भारत आणि युरोपियन युनियनमधील या वाटाघाटी गेल्या २० वर्षांपासून रखडल्या होत्या. अखेर जानेवारी २०२६ मध्ये हा अडथळा दूर झाला. या करारामुळे केवळ व्यापारातच वाढ होणार नाही, तर तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुंतवणुकीचे नवीन मार्ग मोकळे होतील. यामुळे भारताच्या निर्यातीला मोठी गती मिळणार असून, युरोपीय देशांनाही भारतीय बाजारपेठेत स्वस्त दरात उत्पादने उपलब्ध होतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान

जगाची नजर आणि अमेरिकेची नाराजी

या करारामुळे केवळ पाकिस्तानच नाही, तर जगातील इतर महासत्तांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारताचे युरोपशी वाढते आर्थिक संबंध पाहून अमेरिकेने आपली नाराजी व्यक्त केली आहे, तर तुर्कीच्या तज्ज्ञांनीही त्यांच्या व्यापारावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारत हा करार आपल्या ‘विकसित भारत २०४७’ या मोहिमेचा महत्त्वाचा भाग मानत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-EU व्यापार करार (FTA) नक्की काय आहे?

    Ans: हा भारत आणि २७ युरोपीय देशांमधील असा करार आहे ज्याद्वारे दोन्ही बाजूंनी आयात-निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कोणताही कर (Tax) लागणार नाही, ज्यामुळे व्यापार वाढेल.

  • Que: या करारामुळे पाकिस्तानचा तोटा का होत आहे?

    Ans: पाकिस्तानचा कापड उद्योग युरोपवर अवलंबून आहे. आता भारताला शून्य कर सवलत मिळाल्याने भारताचा माल स्वस्त होईल आणि पाकिस्तानचा ९ अब्ज डॉलर्सचा उद्योग स्पर्धा करू शकणार नाही.

  • Que: १ कोटी लोक बेरोजगार कसे होतील?

    Ans: पाकिस्तानच्या कापड उद्योगात सर्वाधिक रोजगार आहे. निर्यात कमी झाल्यामुळे कारखाने बंद पडतील आणि १ कोटीहून अधिक लोकांच्या नोकऱ्या जातील, असा इशारा गौहर एजाज यांनी दिला आहे.

Web Title: India eu fta deal pakistan economic collapse unemployment news 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • india
  • International Trade
  • pakistan

संबंधित बातम्या

Dhaka To Karachi : विमान सेवा सुरू, कट रचणे संपले! कराचीमध्ये बांगलादेशी विमानाचे शाही स्वागत; पाहा VIRAL VIDEO
1

Dhaka To Karachi : विमान सेवा सुरू, कट रचणे संपले! कराचीमध्ये बांगलादेशी विमानाचे शाही स्वागत; पाहा VIRAL VIDEO

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार
2

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार

Security Alert: ‘पाकिस्तानात जाऊ नका!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना दिले कठोर आदेश; यामागील कारण धक्कादायक
3

Security Alert: ‘पाकिस्तानात जाऊ नका!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नागरिकांना दिले कठोर आदेश; यामागील कारण धक्कादायक

फ्रान्समध्ये मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी! १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना डिजिटल प्लॅटफॉर्म नाही
4

फ्रान्समध्ये मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी! १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना डिजिटल प्लॅटफॉर्म नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.