पापुआ न्यू गिनीच्या स्वातंत्र्यदिनी भारताचा झेंडा; आयएनएस कडमॅटने फ्लीट रिव्ह्यूचे नेतृत्व करून दाखवली सागरी ताकद ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
INS Kadmatt PNG fleet review : पापुआ न्यू गिनीच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या ऐतिहासिक नौदल समारंभात भारताने आपल्या सागरी सामर्थ्याची आणि व्यावसायिक शिस्तीची प्रभावी झलक जगाला दाखवून दिली. भारतीय नौदलाचे अत्याधुनिक युद्धनौक आयएनएस कडमॅट (INS Kadmatt) यांनी या विशेष फ्लीट रिव्ह्यूमध्ये प्रमुख भूमिका बजावली आणि सात युद्धनौकांच्या ताफ्याचे नेतृत्व केले.
४ सप्टेंबरला पोर्ट मोरेस्बी बंदरात झालेला हा भव्य कार्यक्रम केवळ एक औपचारिक सैनिकी प्रदर्शन नव्हते; तर तो भारत आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील वाढत्या मैत्रीचे आणि सागरी सहकार्याचे प्रतीक होता. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित पाणबुडीविरोधी युद्धनौका आयएनएस कडमॅट यांना या नेतृत्वाची जबाबदारी मिळणे हे भारताच्या सागरी सामर्थ्याची जागतिक मान्यता मानली जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?
या ताफ्यात भारताच्या आयएनएस कडमॅटसोबत फ्रान्सचे एफएनएस ऑगस्टे बेनेबिग, पापुआ न्यू गिनीची तीन युद्धनौका एचएमपीएनजीएस गिल्बर्ट टोरोपो, एचएमपीएनजीएस टेड डिरो आणि एचएमपीएनजीएस रोचस लोकिनाप, टोंगाची व्हीओईए नाकाहाऊ कौला आणि ऑस्ट्रेलियाची एचएमएएस चाइल्डर्स या जहाजांचा समावेश होता. पाच राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणारा हा ताफा एकाच रांगेत ६०० यार्ड अंतर राखून अचूकतेने पुढे सरकत होता.
पूर्वनियोजित वेळेत सर्व जहाजे त्यांच्या सलामी बिंदूंवर पोहोचली. त्यानंतर ताफ्याने सुरक्षिततेने पुढे जात कार्यक्रमाचा यशस्वी समारोप केला. या प्रक्रियेत आयएनएस कडमॅटच्या नेतृत्वाखालील भारतीय नौदलाने आपल्या अनुशासन, शिस्तबद्ध हालचाली आणि व्यावसायिक क्षमतेचा उत्कृष्ट प्रत्यय दिला.
#INSKadmatt, India’s indigenously built ASW Corvette, led the mobile Fleet Review during Papua New Guinea’s 50th Independence Day celebrations on #04Sep 25 🇮🇳🤝🇵🇬.
Showcasing precision and interoperability, Kadmatt guided a 7-ship multinational column, reaffirming #IndianNavy’s… pic.twitter.com/2A5YWkYPLy
— SpokespersonNavy (@indiannavy) September 6, 2025
credit : social media
या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले की भारतीय नौदल हे केवळ हिंद महासागरापुरते मर्यादित नसून, ते आता इंडो-पॅसिफिक प्रदेशातील एक विश्वासार्ह सुरक्षा भागीदार म्हणून स्वतःला स्थापित करत आहे. बहुराष्ट्रीय वातावरणात अचूकतेने काम करण्याची क्षमता, समन्वय साधण्याचे कौशल्य आणि जागतिक पातळीवरील व्यावसायिकता यामुळे भारतीय नौदलाची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.
यातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे आयएनएस कडमॅट ही पूर्णपणे स्वदेशी डिझाईन केलेली आणि बांधलेली युद्धनौका आहे. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणात भारताने केवळ आपली ताकदच नव्हे तर ‘मेक इन इंडिया’ चा ठसा जगासमोर उमटवला आहे. स्वावलंबनाच्या या प्रवासाने भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेची घोषणा केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Japan News: जपानमध्ये नेतृत्व संकट! पंतप्रधान शिगेरू इशिबा यांचा पंतप्रधान पदावरून राजीनामा; व्यापारी संबाधांवर होणार परिणाम?
पापुआ न्यू गिनी हा पॅसिफिक महासागरातील एक छोटा परंतु रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा देश आहे. भारत आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील हे सहकार्य केवळ लष्करी परिमाणापुरते मर्यादित नसून सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि प्रादेशिक शांततेशीही निगडित आहे. अशा बहुराष्ट्रीय उपक्रमांमुळे प्रादेशिक सुरक्षेला बळकटी मिळते आणि एकमेकांवरील विश्वास अधिक दृढ होतो.
हा कार्यक्रम भारतासाठी केवळ सन्मानाचा नव्हे तर गौरवाचा क्षण ठरला. पापुआ न्यू गिनीच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय नौदलाने निभावलेली मध्यवर्ती भूमिका ही भारताच्या जागतिक स्थानाला पूरक ठरली आहे. यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की भारताचे नौदल हे केवळ संरक्षणाचे साधन नसून मैत्री, सहकार्य आणि प्रादेशिक स्थैर्याचे प्रतीक आहे.