Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशची कबुली! हिंदूंसह अल्पसंख्याकांवर हल्ल्यांमागे राजकीय स्वरुप; ‘इतकी’ प्रकरणे आली नोंदवण्यात

Bangladesh Hindu Violence: बांगलादेशमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रचंड उलथापालथ सुरु आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशने हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांची बाब आता जगजाहीर केली आहे. 

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 12, 2025 | 01:27 PM
bangladesh confession Political motive behind attacks on minorities including Hindus

bangladesh confession Political motive behind attacks on minorities including Hindus

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: बांगलादेशमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रचंड उलथापालथ सुरु आहे. शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्त्तापालट झाले आणि मोहम्मद युनूसचे अंतरिम सरकार स्थापन झाले. सरकारच्या विरोधात उफाळलेले विद्यार्थी आंदोलन, तसेच 1971 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशातून पाकिस्तानी लष्कराची माघार, अल्पसंख्याकांवर आणि विशेषतः हिंदूंविरुद्ध सतत होणारा हिंसाचार अशा अनेक घटना घडल्या. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशने हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांची बाब आता जगजाहीर केली आहे.

हिंदूंवरील हल्ल्यांमागे राजकीय स्वरुप 

केवळ हिंदूच नव्हे तर इतर अल्पसंख्यांक समुदायही बांगलादेशात सुरक्षित नाहीत. हिंदूंवर हल्ले, मंदिरांची तोडफोड आणि इतर प्रकारच्या हिंसेबाबत बांगलादेश सरकारने प्रथमच खुलासा केला आहे. मोहम्मद युनूस यांच्या सरकारने या घटनांमागील कारणे उघड केली आहेत. बांगलादेश सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी 4 ऑगस्टपासून अल्पसंख्याक समुदायांवर वारंवार हल्ले झाले आहेत. बहुतेक घटनांमध्ये या हल्ल्यांना राजकीय स्वरूप असल्याचे सरकारने मान्य केले आहे. तसेच, काही घटनांना साम्प्रदायिक प्रेरणा असल्याचेही त्यांनी कबूल केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘या’ दहशतवादी संघटनेशी युकेच्या 8 संघटनांचा संबंध; UAE ने केले ब्लॅक लिस्टच्या यादीत समाविष्ट

राजकीय प्रेरणा आणि साम्प्रदायिक हिंसा

पोलिसांनी अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, अल्पसंख्याक समुदायांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये राजकीय कारणांचा मोठा वाटा आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदने दावा केला होता की, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्टला देश सोडल्यानंतर, 2010 साम्प्रदायिक हिंसेच्या घटना घडल्या. यातील 1769 घटना हल्ले आणि तोडफोडीच्या स्वरूपाच्या होत्या. या प्रकरणांवर कारवाई करत पोलिसांनी 62 प्रकरणे नोंदवली असून 35 दोषींना अटक केली आहे.

तसेच, या हिंसाचाराबाबत पोलिसांनी अल्पसंख्याक समुदायाशी थेट संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी केला आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, 5 ऑगस्ट 2024 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान साम्प्रगायिक हिंसेच्या 134 घटना नोंदल्या गेल्या आणि पोलिसांनी यातील 53 प्रकरणे नोंदवली असून 65 आरोपींना अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे.परिषदेने केलेल्या दाव्यानुसार, साम्प्रदायिक हिंसेच्या घटनांत वाढ झाली असून अल्पसंख्याकांच्या मालमत्तेचे नुकसान, मंदिरांवर हल्ले आणि धार्मिक असहिष्णुतेच्या घटना वाढत्या प्रमाणात घडत आहेत.

सरकारच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह

बांगलादेश सरकारने या प्रकरणांची दखल घेतली असली तरी साम्प्रदायिक हिंसेच्या घटना थांबवण्यात अद्याप यश आलेले नाही. हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन यांसारख्या अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राजकीय कारणांनी प्रेरित असलेल्या या हिंसेमुळे सामाजिक तणाव वाढत असल्याचे दिसून येते. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ले अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नवीन मिशन; सुनीता विलियम्स 12 वर्षांनंतर करणार ‘स्पेसवॉक’

Web Title: Bangladesh confession political motive behind attacks on minorities including hindus nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • shaikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
2

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
3

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
4

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.