'या' दहशतवादी संघटनेशी युकेच्या 8 संघटनांचा संबंध; UAE ने केले ब्लॅक लिस्टच्या यादीत समाविष्ट(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अबू धाबी: संयुक्त अरब अमिराती (UAE) ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला आहे. UAE ने इस्लामिक दहशतवादी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहुडशी’ संबंध असण्याऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर बंदी घातली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहेत. UAE ने घेतलेल्या निर्णयामध्ये 8 युनायटेड किंगडम (UK)-आधारित संस्थांना इस्लामिक दहशतवादी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहूड’शी संबंधित असल्यामुळे ब्लॅक लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे.
ब्लॅक लिस्ट मध्ये यांचा समावेश
या संस्थांमध्ये कॅम्ब्रिज एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर लिमिटेड, IMA6IN लिमिटेड, वेम्बली ट्री लिमिटेड, वसलफॉरऑल, फ्यूचर ग्रॅज्युएट्स लिमिटेड, यास फॉर इन्व्हेस्टमेंट अँड रिअल इस्टेट, होल्डको यूके प्रॉपर्टीज लिमिटेड आणि नाफेल कॅपिटल यांचा समावेश आहे. UAE च्या या निर्णयानुसार, या संस्थांशी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींवर प्रवास बंदी व मालमत्तेच्या जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. UAE मधील व्यक्ती किंवा संस्थांना या ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या संस्थांसोबत काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय, आणखी 11 व्यक्तींनाही दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या व्यक्तींपैकी बहुतेकजण UAE चे नागरिक आहेत. WAM वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, UAE दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याचे जाळे उध्वस्त करण्यासाठी स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्नशील आहे.
8 UK organizations that the UAE 🇦🇪 designated as Islamist terrorist entities:
It needs courage 🦾 🇦🇪
1. Cambridge Education and Training Centre Ltd
2. IMA6INE Ltd
3. Wembley Tree Ltd
4. Waslaforall
5. Future Graduates Ltd
6. Yas for Investment and Real Estate
7. Holdco UK… pic.twitter.com/WRzripkhhr— حسن سجواني 🇦🇪 Hassan Sajwani (@HSajwanization) January 11, 2025
काय आहे मुस्लिम ब्रदरहूड?
मुस्लिम ब्रदरहूड ही इस्लामिक दहशतवादी संघटना 1928 साली इजिप्तमध्ये हसन अल-बन्ना यांनी स्थापन केली होती. या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट राजकीय इस्लामचा प्रचार करणे, शरीयत कायद्याची अंमलबजावणी करणे आणि हिंसा व दहशतवाद पसरवणे आहे. मुस्लिम ब्रदरहूडच्या कार्यप्रणालीला विरोध म्हणून अनेक अरब देशांनी, ज्यामध्ये इजिप्त, सौदी अरेबिया आणि UAE यांचा समावेश आहे, या संघटनेवर बंदी घातली आहे. ही संघटना धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्ये आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेला थेट धोका निर्माण करते. त्यामुळे, UAE च्या या निर्णयाचे महत्त्व वाढते. दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.