
bangladesh election 2026 sheikh hasina retirement plan awami league support to jatiya party
Sheikh Hasina retirement news January 2026 : बांगलादेशच्या (Bangladesh) राजकारणात सध्या अशा हालचाली सुरू आहेत, ज्यामुळे आगामी १२ फेब्रुवारी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे संपूर्ण गणित बदलू शकते. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या आणि ऑगस्ट २०२४ च्या बंडांनंतर देश सोडून पळून जावे लागलेल्या शेख हसीना (Sheikh Hasina) आता एक शेवटची ‘भावनिक आणि राजकीय खेळी’ खेळण्याच्या तयारीत आहेत. ७८ व्या वर्षी निवृत्तीचे संकेत देऊन हसीना केवळ सहानुभूती मिळवत नसून, सत्तेच्या चाव्या पुन्हा आपल्या हातात कशा येतील, याचा ‘प्लॅन बी’ (Plan B) राबवत आहेत.
शेख हसीना यांचे पुत्र साजीद वाजेद जॉय यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले की, त्यांच्या आईने वाढत्या वयामुळे आणि प्रकृतीमुळे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे ठरवले आहे. मात्र, जाणकारांच्या मते हे केवळ ‘स्ट्रॅटेजिक रिटायरमेंट’ (Strategic Retirement) असू शकते. बांगलादेशात अवामी लीगवर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, हसीना यांनी स्वतःला बाजूला सारून जनतेला भावनिक आवाहन केले आहे, जेणेकरून बंदी असतानाही त्यांचे मतदार दुसऱ्या एका विशिष्ट पक्षाच्या पाठीशी उभे राहतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Security: इस्रायलचा संयुक्त राष्ट्रांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! जेरुसलेममधील UNRWA मुख्यालय बुलडोझरने पाडले; जग हादरले
अवामी लीगवर बंदी असल्याने हसीनाचा पक्ष थेट निवडणूक लढवू शकत नाही. म्हणूनच, त्यांनी ‘जातीय पक्षा’ला (Jatiya Party) पुढे केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक अवामी लीग नेत्यांना जातीय पक्षाच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. यामध्ये तांगाईल-१ मधून इलियास हुसेन आणि तांगाईल-६ मधून तारेक शम्स यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. हा एक प्रकारे ‘अवामी लीग २.०’ चाच प्रयोग मानला जात आहे, जिथे चेहरा जातीय पक्षाचा असेल पण नियंत्रण हसीनाच्या जवळच्या लोकांकडे असेल.
Sheikh Hasina set to resign! During an exclusive interview with Al Jazeera journalist Srinivasan Jain, Sajeeb Wazed Joy categorically said, his mother Sheikh Hasina will not continue in politics and there will be a new leadership in her party – Awami League. pic.twitter.com/F9j0pkeqwv — Salah Uddin Shoaib Choudhury (@salah_shoaib) January 21, 2026
credit – social media and Twitter
बांगलादेशातील ही निवडणूक सध्या बीएनपी (BNP) आणि जमात-ए-इस्लामी या दोन मोठ्या आघाड्यांमधील संघर्ष मानली जात आहे. अवामी लीगला ठाऊक आहे की ते सध्या सत्तेत येऊ शकत नाहीत, पण त्यांना ‘जमात’ सारख्या कट्टरपंथी पक्षाला तिसऱ्या स्थानावर ढकलायचे आहे. जर जातीय पक्षाने किंगमेकरची भूमिका बजावली, तर भविष्यात अवामी लीगवरील बंदी उठवणे आणि शेख हसीना किंवा त्यांच्या वारसाला सन्मानाने ढाक्यात परत आणणे सोपे होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Security: इराणच्या उंबरठ्यावर 7000 दहशतवादी; खामेनेईंचा फास आवळण्यासाठी अमेरिकेने सीरियाला धरले वेठीशी, पहा कसे?
शेख हसीना लवकरच एका व्हिडिओ संदेशाद्वारे बांगलादेशातील जनतेशी संवाद साधून आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा करू शकतात. “मी देशासाठी सर्वस्व त्यागले, आता तुमच्या हातात देशाचे भविष्य आहे,” असे भावनिक आवाहन करून त्या आपल्या पारंपारिक मतदारांना जातीय पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. जर हे समीकरण यशस्वी झाले, तर १२ फेब्रुवारीचा निकाल मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारसाठी आणि विरोधी पक्षांसाठी धक्कादायक ठरू शकतो.
Ans: ऑगस्ट २०२४ च्या हिंसक आंदोलनांनंतर आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांनंतर अंतरिम सरकारने अवामी लीगच्या राजकीय हालचालींवर बंदी घातली आहे.
Ans: ऐतिहासिकदृष्ट्या जातीय पक्ष अवामी लीगचा मित्रपक्ष राहिला आहे. २०२६ च्या निवडणुकीत अवामी लीगचे अनेक नेते जातीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
Ans: हसीनाच्या निवृत्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये भावनिक लाट निर्माण होऊ शकते, ज्याचा फायदा त्यांच्या छुप्या मित्रपक्षाला (जातीय पक्षाला) मिळू शकतो.