इस्रायलचा 'बुलडोझर' आता संयुक्त राष्ट्रांवर! जेरुसलेममधील UNRWA मुख्यालय पाडले; जग हादरले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Israel demolishes UNRWA headquarters Jerusalem 2026 : मध्य पूर्वेतील तणाव आता केवळ युद्धापुरता मर्यादित राहिला नसून, तो थेट जागतिक संस्थांच्या अस्तित्वावर येऊन ठेपला आहे. इस्रायलने (Israel) मंगळवारी एक अत्यंत धाडसी आणि वादग्रस्त पाऊल उचलत पूर्व जेरुसलेममधील संयुक्त राष्ट्रांच्या ‘पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सी’चे (UNRWA) मुख्यालय जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे इस्रायल आणि संयुक्त राष्ट्र (United Nations) यांच्यातील संबंध आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत.
सीएनएनच्या अहवालानुसार, इस्रायली पोलिस आणि ‘इस्रायल लँड अथॉरिटी’चे अधिकारी मोठ्या ताफ्यासह आणि जड अभियांत्रिकी उपकरणांसह (बुलडोझर) UNRWA च्या कंपाऊंडमध्ये शिरले. कडक सुरक्षेत इमारतीचे काही भाग पाडण्यास सुरुवात झाली. इस्रायली अधिकाऱ्यांनी जाहीर केले की, त्यांनी या मालमत्तेचा पूर्ण ताबा घेतला असून आता ही जमीन इस्रायल सरकारच्या अखत्यारीत आली आहे. या कारवाईसाठी इस्रायली संसदेने (Knesset) नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन कायद्यांचा आधार घेण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर
संयुक्त राष्ट्रांच्या या एजन्सीने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “हे पाऊल म्हणजे केवळ एका इमारतीवरचा हल्ला नाही, तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत तत्त्वांवरचा हल्ला आहे,” असे UNRWA ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर म्हटले आहे. १९४९ मध्ये ज्या करारावर इस्रायलने स्वाक्षरी केली होती, त्यानुसार संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही कार्यालयाला शोध, जप्ती किंवा हस्तक्षेपापासून संरक्षण (Immunity) प्राप्त आहे. मात्र, इस्रायलने या सर्व नियमांना धाब्यावर बसवले आहे.
CRUSHED: Israel demolished UNRWA HQ in Jerusalem today
⭕️ UNRWA knowingly employed Hamas terror chiefs to run their education system
⭕️ UNRWA school graduates were the October 7th murderers and rapists
⭕️ For 10 years we urged UNRWA to end their terror ties but they refused 🧵 pic.twitter.com/xiyRKENrmM — Hillel Neuer (@HillelNeuer) January 20, 2026
credit – social media and Twitter
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इस्रायलच्या मते, जेरुसलेममधील ती जमीन इस्रायली मालमत्ता आहे आणि UNRWA ने तिथे आपले काम आधीच थांबवले होते. इस्रायलचा सर्वात गंभीर आरोप हा आहे की, UNRWA ही संस्था आता मानवतावादी राहिलेली नाही, तर ती हमासच्या दहशतवाद्यांना आश्रय देणारी आणि त्यांना आर्थिक रसद पुरवणारी यंत्रणा बनली आहे. “आम्ही आमच्या भूमीवर दहशतवादाचे केंद्र चालू देणार नाही,” असे इस्रायली सरकारने ठणकावून सांगितले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Security: इराणच्या उंबरठ्यावर 7000 दहशतवादी; खामेनेईंचा फास आवळण्यासाठी अमेरिकेने सीरियाला धरले वेठीशी, पहा कसे?
डिसेंबर २०२५ मध्ये इस्रायलने एक कठोर कायदा संमत केला होता, ज्यानुसार पूर्व जेरुसलेममधील UNRWA च्या सर्व कार्यालयांना पाणी आणि वीज पुरवठा बंद करण्यात आला. तसेच, त्यांच्या सर्व हालचालींवर बंदी घालण्यात आली. या कायदेशीर प्रक्रियेचा शेवट आता मुख्यालय पाडण्यात झाला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या कृतीचा निषेध करत इस्रायलला हे पाऊल तातडीने मागे घेण्याचे आवाहन केले आहे, मात्र इस्रायल आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे.
Ans: इस्रायलचा असा दावा आहे की ही जमीन त्यांची मालकीची आहे आणि ही संस्था (UNRWA) हमास या दहशतवादी संघटनेला सहकार्य करत आहे.
Ans: ही संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे जी १९४९ पासून पॅलेस्टिनी निर्वासितांना शिक्षण, आरोग्य आणि मानवतावादी मदत पुरवण्याचे काम करते.
Ans: संयुक्त राष्ट्रांनी याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि राजनैतिक संरक्षणाचे (Diplomatic Immunity) स्पष्ट उल्लंघन म्हटले असून कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे.






