'अशाप्रकारे चीन वाळवंटाला हिरवळीत बदलत आहे...' काय आहे ग्रेट ग्रीन वॉल २.० प्रकल्प? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Great Green Wall 2.0 : वाढते वाळवंटीकरण हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला असताना, चीनने यावर एक अत्यंत स्वस्त आणि प्रभावी उपाय शोधून काढला आहे. चीनचा (China) महत्त्वाकांक्षी ‘ग्रेट ग्रीन वॉल’ (Great Green Wall) प्रकल्प आता २.० च्या टप्प्यात पोहोचला असून, यावेळी शास्त्रज्ञांनी निसर्गातील एका सर्वात जुन्या जीवाचा निळ्या-हिरव्या शैवालचा (Cyanobacteria) आधार घेतला आहे. केवळ झाडे लावून वाळवंट रोखण्याच्या पारंपारिक पद्धतीऐवजी, आता थेट वाळूवर ‘जैविक कवच’ चढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गेल्या ४ दशकांपासून चीन उत्तर भागात झाडांची भिंत उभी करत आहे. मात्र, नव्या तंत्रज्ञानात शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत विकसित केलेले सात प्रकारचे विशेष शैवाल वाळवंटात फवारले आहेत. हे शैवाल अत्यंत उष्णता, तीव्र सूर्यप्रकाश आणि दुष्काळातही जिवंत राहू शकतात. जेव्हा पावसाचा थोडासा स्पर्श होतो, तेव्हा हे शैवाल वेगाने वाढतात आणि वाळूच्या कणांना एकमेकांशी जोडून एक घट्ट थर तयार करतात. यालाच शास्त्रज्ञ ‘सायनोबॅक्टेरियल क्रस्ट’ म्हणतात. हा थर वाळूला हवेत उडण्यापासून रोखतो आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : New Year 2026: आकाशात फिनिक्सची झेप! दुबई-अबु धाबीत नववर्षाचे जोरदार स्वागत अन् जागतिक विक्रमांची रास, पाहा VIDEO
नैसर्गिकरित्या वाळवंटात असा मातीचा थर तयार होण्यासाठी १० ते २० वर्षे लागतात. मात्र, चीनच्या शापोटोउ वाळवंट संशोधन केंद्राने (Shapotou Desert Research Station) विकसित केलेल्या या पद्धतीमुळे आता हे काम अवघ्या एका वर्षात पूर्ण होत आहे. शास्त्रज्ञांनी या शैवालला काही सेंद्रिय पदार्थांसोबत एकत्र करून लहान ‘ब्लॉक्स’ तयार केले आहेत. हे ब्लॉक्स वाळवंटात पसरवल्यानंतर तिथे वनस्पती वाढवण्यासाठी आवश्यक असलेला पाया तयार होतो. यामुळे भविष्यात तिथे गवत आणि लहान झुडपे सहजपणे जगू शकतात.
Africa is building a wall… Made of trees. 8,000 km of green defiance stretching from Senegal to Djibouti: it’s called the Great Green Wall – a plan to stop the Sahara desert, restore dead land, and lift 100 million people. [🎞️ africabusinessheroes]pic.twitter.com/iEx28IOeSs — Massimo (@Rainmaker1973) December 30, 2025
credit : social media and Twitter
या प्रकल्पाचा एक भाग म्हणून चीनने वाळवंटात जगातील सर्वात मोठे फोटोव्होल्टेइक (PV) सोलर पार्क्स उभारले आहेत. हे सोलर पॅनल्स केवळ वीजच तयार करत नाहीत, तर ते जमिनीला सावली देऊन तिथे आर्द्रता टिकवून ठेवतात. या पॅनल्सच्या खालीच आता या शैवाल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे प्रयोगही यशस्वी होत आहेत. यामुळे वाळवंटी प्रदेश आता केवळ ‘हिरवा’ होत नाही, तर तो ‘आर्थिकदृष्ट्या सक्षम’ देखील होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : New Year 2026: आकाशात फिनिक्सची झेप! दुबई-अबु धाबीत नववर्षाचे जोरदार स्वागत अन् जागतिक विक्रमांची रास, पाहा VIDEO
चीनने या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तर चीनमधील ९४,७०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर वाळू नियंत्रण मिळवले आहे. आता हेच ‘होमग्रोन’ तंत्रज्ञान आफ्रिकेतील ‘ग्रेट ग्रीन वॉल’ प्रकल्प आणि मंगोलियामध्येही निर्यात केले जात आहे. ज्याला जगाने ‘पृथ्वीचा कॅन्सर’ (वाळवंटीकरण) म्हटले होते, त्यावर चीनने हे जैव-तंत्रज्ञानाचे औषध शोधून काढले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
Ans: हा चीनचा उत्तर भागातील वाळवंटाचा विस्तार रोखण्यासाठी झाडे लावण्याचा आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्याचा ४ दशकांचा महाप्रकल्प आहे.
Ans: हे सूक्ष्म जीव वाळूच्या कणांना एकत्र बांधून एक 'बायो-क्रस्ट' (जैविक थर) तयार करतात, ज्यामुळे वाळू स्थिर होते आणि झाडांच्या वाढीस मदत होते.
Ans: कारण हे तंत्र अत्यंत कमी पाण्यात कार्य करते आणि जिथे झाडे जगू शकत नाहीत, तिथेही जमिनीचा पाया मजबूत करण्यास मदत करते.






