शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ; बांगलादेशच्या प्रचारात 'या' महिलेची होतेय जोरदार चर्चा (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
हबीबा बेगम यापूर्वी हसीनाच्या काळात राजकारणात सक्रिय होत्या. सध्या त्या राजशाही-३ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. हबीबा त्यांच्या अनोख्या प्रचारमुळे बांगलादेशात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी शेख हसीना सरकारच्या काळात ७ वेळा तुरुगंवास भोगला होता. तसेच सध्या त्या ई-रिक्षातून आपल्या मुलाला घेऊन प्रचार करत आहे. त्यांच्या या साधेपणामुळे त्या थेट जनतेशी जोडल्या गेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हबीबा बेगमवर हसीना सरकाच्या काळात अवामी लीग पक्षाने सहा खटले दाखल केले होते. यावेळी त्यांना या खटल्यांमुळे सात वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता. सध्या न्यायालयाने २०११ मध्ये दोन खटले रद्द केले आहे.
हबीबा यांचा निवडणूका मार्ग सोपा नव्हता. त्यांच्याकडे निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नाही, खर्चासाठी पैसे नाहीत. तसेच त्यांचा उमेदवारीचा अर्जही दोन वेळा रद्द करण्यात आला होता. परंतु त्यांनी माघार घेतली नाही. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपला अर्जाला परवानगी मिळवली. त्यांना फुटबॉल हे चिन्ह देण्यात आले.
हबीबा यांच्याकडे प्रचारासाठी पैस नव्हते, परंतु त्यांच्या पतीने आपली जमिनी गहाण ठेवत प्रचारासाठी पैसा जमा केला. सध्या हबीबा मोहमनपूर उपजिल्ह्यात सिंघोमार गावातून प्रचार करत आहेत. ना कोणता मोठा ताफा, ना पक्षाचे झेंड, ना महागड्या गाड्या… हबीबा आपल्या पतीसोबत ऑटो रिक्षातून बाळाला सोबत घेऊन बाजारामंध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत प्रचार करत आहेत.
हबीबा २०११ मध्ये पहिल्यांदा राखीव महिला जागेवरुन संघ परिषदेत निवडून आल्या होता. नंतर त्या मोहनपूरच्या उपाध्यक्षा झाल्या. परंतु २०२४ मध्ये त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आले होते. सध्या त्या पुन्हा उभ्या राहिल्या असून प्रवास अधिक खडतर आहे.
बांगलादेशात लोकशाहीचा अंत? आगामी निवडणुकींचा निकाल आधीच ठरलाय…; हसीना यांच्या मुलाच्या दाव्याने खळबळ
Ans: हबीबा बेगम सध्या राजशाही-३ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत. त्यांचा इ-रिक्षातून, बाळाला कडेवर घेऊ प्रचारामुळे थेट जनतेशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्या या साधेपणामुळे त्यांची बांगलादेशात जोरदार चर्चा सुरु आहे.
Ans: हबीबा बेगम यांच्यावर हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने खटले दाखल केले होते यामुळे त्यांना ७ वेळा तुरुंगात जावे लागले होते.
Ans: हबाबी बेगम यांनी त्यांच्याकडे प्रचाराचा ताफा पक्षाचे झेंडे किंवा महागड्या गाड्यांमधून नव्हे, तर ई-रिक्षातून आपल्या बाळाला घेऊन त्यांनी निवडणुकीसाठी प्रचार केला.
Ans: निवडणूक खर्चासाठी हबीबा बेगम यांच्या नवऱ्याने आपली जमिन १.७० टका लाखाला जमिन घाण ठेवली आणि गरज पडल्यास पुन्हा असेच करु असे त्यांनी सांगितले.






